कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूरात करवीर अधिपती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीराजे फौंडेशनच्या वतीने कोल्हापूर व परिसरातील गोरगरीब लोकांचा मोठा आधार असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी रुग्णालयात येणाऱ्या लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ठिकठिकाणी आर.ओ. (R0)सिस्टीम बसवण्यासाठी खा. संभाजीराजेंच्या कडून निधी उपलब्ध करुन देण्यात आला. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी साहेब, एनएसएसचे विद्यार्थी व छत्रपती संभाजीराजे फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.