कोल्हापूर /प्रतिनिधी
विश्व मेडिकल अॅडमिशन पाँइंट या नामांकित एमबीबीएस डॉक्टर बनविणाऱ्या संस्थेचे संस्थापक संचालक ज्ञानेश्वर भस्मे आणि प्रमोद कमलाकर यांचा वाढदिवस कोल्हापूर कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान भस्मे सर आणि प्रमोद सरांवर वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्रत्यक्ष भेटून, फोनवरून तसेच फेसबुक, व्हाट्सअप ,ट्विटर अशा माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
विश्व मेडिकल अॅडमिशन पाँइंट चे संस्थापक संचालक ज्ञानेश्वर भस्मे व प्रमोद कमलाकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिं.६ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम संपन्न झाले.तर विश्वच्या कोल्हापूरात कार्यालयात मोठ्या उत्साहात केक कापूस ज्ञानेश्वर भस्मे व प्रमोद कमलाकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी
मिरर कोल्हापूर न्यूज चँनलचे संपादक सतीश वणीरे यांच्या सह विश्वच्या व्यवस्थापिका शब्दगंधा पाटील,मँनेजर सौ.संचिता घाटगे,ओंकार पाटील,सुर्यकांत जांभळे, श्रीकांत पाटील, ओंकार वळविडे,आशितोष वरुटे, हर्ष सरीकर,समर्थ पारगावकर यांच्या सह विश्व व मिरर कोल्हापूर न्यूज चँनलच्या सहकार्यांनी भस्मे सर व प्रमोद सरांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान ताराबाई पार्क मधील पितळी गणपती जवळ नाना- नानी पार्कमध्ये राजर्षी शाहू हस्य क्लबच्या वतीने डॉ.दिलीप शहा व क्लबच्या पदाधिकारी,सदस्यांनी केक कापून भस्मे सर व प्रमोद सरांना शुभेच्छा दिल्या. तर रेसिडन्सी क्लब आणि नागाळा पार्क असोसिएशनच्या वतीने प्रमोद देशपांडे, ठोमके,पाटील यांनी केक कापून भस्मे सर आणि प्रमोद सरांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. दरम्यान भस्मे सर आणि प्रमोद सरांवर वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्रत्यक्ष भेटून, फोनवरून तसेच फेसबुक, व्हाट्सअप ,ट्विटर अशा माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.