कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूरात अश्वघोष आर्ट अँड कल्चर फौंडेशन यांच्या वतीने रंकाळा पदपथ उद्यानात दिं.१२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वा “मै जिंदगी का साथ निभाता चला गया” ही संगीत मैफिल संपन्न होणार आहे. यावेळीे शारीरिक अपंगत्वावर मात करून यशाचे शिखर गाठणाऱ्या कलाक्षेत्रातील उद्योन्मुख कलाकारांना “मोहम्मद रफी जीवन प्रेरणा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.अशी माहिती अश्वघोष फौंडेशनचे अध्यक्ष कबीर नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर येथील प्रसिद्ध गायक कबीर नाईकनवरे हे अश्वघोष आर्ट अँड कल्च फौंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. कला क्षेत्रातील गरीब, गरजू कलाकारांच्या पाठीशी ते नेहमीच उभे राहतात. दिं.१२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता रंकाळा येथील पदपथ उद्यानात शारीरिक अपंगत्वावर मात करून मला क्षेत्रात यशाचे शिखर गाठणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. मोहम्मद रफी जीवन प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला जाणार आहे. यामध्ये राहुल चित्र चित्रुक, विनायक व्हावळ, बंडू सुतार, निखील कुंडले, अविनाश कुलकर्णी, तानाजी देसाई, हिंदुराव कोले, आकाश पाटील या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
याचेच औचित्य साधून रफी, किशोर, लता, आशा अशा दिग्गजांनी गायलेल्या व आयुष्याचे विविध पैलू सांगणाऱ्या गीतांची “मै जिंदगी का साथ निभाता चला गया” ही संगीत मैफिल संपन्न होणार आहे. यामध्ये कबीर नाईकनवरे यांच्यासोबत कोल्हापुरातील प्रसिद्ध गायक मोहसीन शेख, स्नेहलता सातपुते, अरुण पाटील गायक म्हणून सहभागी होणार आहेत. तर प्रसिद्ध निवेदक साहिल शेख व प्रवीण बनसोडे हे या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
पत्रकार परिषदेला मंदार पाटील, रविराज सदाजय, कौस्तुभ शिंदे, सुनील कांबळे उपस्थित होते.