कोल्हापूर /प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी कसबा बावडा मंडल नुतन अध्यक्ष निवडीची बैठक नुकतीच लाइन बाजार येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, निवडणूक अधिकारी साजन माने, चंद्रकांत घाटगे, धीरज उलपे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी प्रास्ताविक करुन मंडल अध्यक्षाचे नाव जाहीर केले. प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते डॉ सदानंद राजवर्धन यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या निवडीसाठी संजय जासुद हे सुचक म्हणून तर धीरज पाटील यानी त्यास अनुमोदन दिले.
प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी कसबा बावड्यामध्ये कार्यकर्त्यांनी बुथ स्तरावर पक्ष संघटना मजबूत करुन सर्वांनी मोठ्या संख्येने कार्यक्रम राबवावेत असे सांगितले. यावेळी राजेंद्र पवार, मनोज इंगळे, सतीश वेटोळे, रावसाहेब शिंदे, इंद्रजीत वाडकर, सचिन करडे, प्रथमेश गायकवाड, धीरज गायकवाड, अमोल भोसले, सुधाकर पवार, तानाजी रणदिवे, अशोक खनाई यांच्यासह मंडलातील सर्व बुथ प्रमुख,पदाधिकारी,सर्व भाजपा कार्यकर्ते व सर्व सक्रीय सदस्य यावेळी उपस्थित होते.