कोल्हापूर: शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये 12 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. सदरच्या मोहिमेचा सदतीसावा रविवार असून या अभियानामध्ये शहरातील जेष्ठ नागरीक, शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, विवेकानंद कॉलेज विद्यार्थी विद्यार्थीनी, वृक्ष प्रेमी संघटना, स्वरा फौंडेशन कार्यकर्ते, कोल्हापूर शहर परिट समाज कार्यकर्ते, मेणन कंपनीचे कर्मचारी, स्वच्छता दुत अमित देशपांडे व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. सदरची मोहिम आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी यावेळी बोलतांना आज सलग सदतीसावा रविवार आहे. दर महिन्यातून एकदा स्वच्छता मोहिमेत सर्वानी सहभागी व्हावे प्लॅस्टिकचा वापर करुनका व इतरानांही करुदेवू नका असे सांगितले.
यावेळी रंकाळा तलाव शाहू स्मृती बाग, आयसोलेशन हॉस्पीटल ते शेंडा पार्क, रिलायन्य मॉल मागील संपुर्ण, नर्सरीबाग सिध्दार्थनगर राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ, डायना पार्क येथील ओपन स्पेस, शुक्रवार पेठ गायकवाड वाडा नजीक, शिर्के उद्यान, रेल्वे गुड्स, कोटीतीर्थ तलाव, हुतात्मा पार्क या परिसराची तसेच दसरा चौक ते खानविलकर पेट्रोल पंप, रंकाळा टॉवर ते फुलेवाडी फायर स्टेशन, डिपार्टमेंट ऑफ टेक्नालॉजी शिवाजी विद्यापीठ रोड, उड्डान पूल ते कावळा नाका व कावळा नाका ते तावडे हॉटेल, कळंबा फिल्टर कळंबा मेनरोड, व पापाची तिकटी ते गंगावेश रोडचीही स्वच्छता या मोहिमेत करण्यात आली. या मोहिमेत 4 जेसीबी, 5 डंपर, 6 आरसी गाडया व महापालिकेच्या 140 स्वच्छता कर्मचा-यांच्या सहाय्याने ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
महानगरपालिकेने ग्र्क़्क़ अअ हा बहुमान मिळवला आहे. आता 5 च्द्यठ्ठद्ध हा बहुमान पटकाविण्यासाठी प्रयत्न करित आहे. सर्वांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा साठवून ओल्या कच-यापासून घरी खतनिर्मिती करावी. स्वच्छ सर्व्हेक्षणातील जे सात निकष आहेत. त्यामध्ये कोल्हापूर शहरवासीयांनी सहभागी होऊन आपले अभिप्राय द्यावेत. सर्वांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, नागरीकांनी प्लॅस्टिकचा वापर पुर्णपणे बंद करावा अशी जनजागृती रंकाळा शाहू स्मृती उद्यान येथे श्रीमंत जिजाऊ फौंडेशन आयोजित वॉक थॉन 2020 मध्ये सहभागी स्पर्धकांना व उपस्थितांना स्वच्छता मोहिमे दरम्यान करण्यात येत होती.
यावेळी नगरसेवीका सुरेखा शहा, माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे, आरोग्यधिकारी डॉ.दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, शाखा अभियंता आर.के.पाटील, शिक्षण विभागाचे बाबा साळोखे, क्रिडा निरिक्षक सचिन पांडव, सर्व आरोग्य निरिक्षक, शशिकांत भालकर, स्वरा फौंडेशनचे अदिल्य लातूरकर, व्हाईट आर्मीचे प्रशांत शेंडे, विनायक भाट, प्रेम सातपुते व नागरिक यांनी सहभाग नोंदविला.