कोल्हापूर /प्रतिनिधी- कोल्हापूरात शहर शिवसेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून छत्रपती शिवरायांची बरोबरी नरेंद्र मोदी यांच्यासोबत करणाऱ्या लेखक जय भगवान गोयल यांच्या निषेधार्थ शिवाजी चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आलीतं. यावेळी संतप्त शिवसैनिकांसह महिलांनी जय गोयलच्या पोस्टरला कोल्हापूरी चपलांचा प्रसाद देऊन जाहीर निषेध व्यक्त केला.दरम्यान या पुस्तकाच्या लेखकाने जाहीर माफी मागावी , पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली. यावेळी जय भवानी जय शिवाजी, जय गोयल कोण रे ..पायताण मारा दोन रे.. अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दरम्यान यापुढं महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान खपवून घेणार नाही.वेळ पडल्यास भाजप विरोधात रस्त्यावर उतरु असा इशारा शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला. आंदोलनात युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, महेश उत्तुरे, जयवंत हारुगले, दीपक चव्हाण, धनाजी दळवी, अश्विन शेळके, दादू शिंदे, सुनील खोत, दीपक गौड, अजित राडे, रमेश खाडे, किशोर घाटगे, रणजित जाधव, महिला आघाडी शहरप्रमुख मंगल साळोखे, पूजा कामते, गौरी माळतकर, मीनाताई पोतदार, मंगल कुलकर्णी, रुपाली कवाळे यांच्या सह शिवसेना पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.