कोल्हापूर/प्रतिनिधी
सध्याच्या माहिती विस्फोटाच्या युगात प्रत्येक युवकाला परिपूर्ण ज्ञान देणारे संस्कारक्षम आणि जीवन मूल्याधारित शिक्षण घावे आणि भविष्यात त्यांची व्याप्ती वाढावावी यासाठी विश्व हिंदू परिषदेचा भविष्यात मानस राहील आणि विविध सेवा कार्यातून समाजात सुसंवाद वाढीस लागावा या साठी विहीप सक्रीय राहील अस मत केंद्रीय सचिव सेवा विभाग मधुकर दीक्षित यांनी व्यक्त केलयं .गेले दोन दिवस सुरू असलेल्या पश्चिम महाराष्ट्र बैठकीचा आढावाही त्यांनी यावेळी विषद केला. त्यांच्यासमवेत संत्सग विभाग प्रमुख , हभप पनौरे महाराज जिल्हा कार्यौध्यक्ष तर प्रसाद मुजुमदार , जिल्हा मंत्री अँड.रणजितसिंह घाटगे , सह मंत्री विक्रम बोधे , श्रीरंग राजे , सुरेश रोकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे बहुचर्चित समीकरण असले तरीही मातृशक्ती, दुर्गा वाहिनी, गोशाळा- गोरक्षा – प्रकल्प , सामाजिक समरसता ,संत्सग , मठ – मंदिर – धर्माचार्य संपर्क , सेवा विभाग , एकलव्य शाळा असे विश्व हिंदू परिषदेचे विविध 18 कामाचे पैलु आहेत , या संदर्भाने या विभागातील बावीस जिल्ह्यातील पदाधिकारी व या विविध प्रकल्प प्रमुखांची या दोन दिवसात सविस्तर चर्चा झाली. आगामी काळात गाव आणि ग्रामपंचायत पातळीपर्यंत कार्यविस्तार करण्यासाठी सूक्ष्म पातळीवर नियोजन करण्यात आले अशी माहिती त्यांनी या वेळी दिली. विश्व हींदू परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीने केलेले दोन ठरावच या दोन दिवसाच्या बैठकीत पुन्हा एकदा मांडून ते व्यापक चर्चैसह सहमत करण्यात आले .यामध्ये तिरुपती बालाजी सह हिंदूंच्या देवस्थानाच्या व्यवस्थापना मध्ये ख्रिश्चनांनासह अन्य धर्मियाना प्रवेश देऊ नये , केरळ सरकारच्या नियोजित मौलवी आणि फादर यांच्या मानधानास विरोधी करणे आणि या साठी व्यापक जागरण करणे हे ते दोन ठराव होते. समाजातील विविध प्रश्नावर फक्त सरकारची नवे दर नागरिकाची तितकीच जबाबदारी आहे आणि त्याने ती प्रामाणिक मध्ये पार पडल्यास भारत देश सक्षमतेने एक प्रबळ राष्ट्र म्हणून जगासमोर पुन एकदा येईल , असा विहीप चा विश्वास असून त्यादृष्टीने विविध अठरा पैलूवर महानगरा पासून ते दुर्गम खेडे गावापर्यत विहिप कार्यरत आहे , विविध समस्यावर सत्ताधारी राज्यकर्त्यांना असणाऱ्या मर्यादा मुल्य निष्ठीत समाजातील प्रत्येक व्यक्ती समुहातून दूर होतीलच , त्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे असून त्या साठीच विश्व हींदू परिषदेचा आग्रह असल्याचेही त्यांनी पुन्हा एकदा शेवटी सांगितले या बैठकीस पश्चिम महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातील 234 प्रतिनिधी उपस्थित होते.