भावनांनी भरलेल्या रोलरकास्टर राइडसाठी सज्ज राहा. भारताचे सर्वात लोकप्रिय हिंदी जीईसी चॅनेल सोनी सब आपल्या चाहत्यांसाठी नवीन विनोदी मालिका ‘मॅडम सर‘ सादर करत आहे. ‘कुछ बात है, क्युंकी जजबात है‘ हे योग्य टॅगलाइन असलेली ही चार डायनॅमिक पोलिस अधिका-यांच्या दृष्टिकोनातून सध्याच्या सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकणारी नवीन मालिका आहे. हे चारही पोलिस अधिकारी त्यांच्या अनोख्या स्टाइलने प्रेक्षकांची मने जिंकणार आहेत आणि त्यांची खासियतच त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते.
लखनौमध्ये राहणा-या चार महिला पोलिस अधिकारी त्यांच्यासमोर येणा-या सर्व आव्हानांचा सामना करणार आहेत आणि त्यांच्या अद्वितीय स्टाइलमध्ये आव्हानांचे निराकरण करणार आहेत. सावधान राहा – प्रतिभावान स्टार कलाकार तुमच्या भेटीसाठी येत आहेत. या मालिकेमध्ये गुल्की जोशी (हसीना मलिक), युक्ती कपूर (करिष्मा सिंग), भाविका शर्मा (संतोष शर्मा), सोनाली नाईक (पुष्पा सिंग) यांच्यासह रिपोर्टरच्या भूमिकेत गौरव वाधवा असणार आहे. हे सर्व त्यांच्या सर्वोत्तम अभिनयासह तुमचे लक्ष वेधून घेणार आहेत आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण संदेश देणार आहेत.
‘मॅडम सर‘ ही सोनी सबवरील काही हलक्या-फुलक्या तत्त्ववादी कन्टेन्टच्या मालिकांमध्ये आणखी एक भर आहे. सोनी सबने या मालिकेच्या माध्यमातून ‘खुशियोवाली फिलिंग‘चे तत्त्व कायम राखले आहे.