कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा विविध उपक्रमांनी छत्रपती शिवाजी चौकात उत्साहात शिवमय वातावरणात साजरा करण्यात आला.प्रतिमा पूजन उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले .तर सत्यशोधक पद्धतीने राज्याभिषेक विधी करून जलपूजन करण्यात आले.तसेच जिजाऊ वंदन सामूहिक रीत्या म्हणून कार्यक्रमास सुरुवात झाली
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर छत्रपती शिवरायांचा छावा छत्रपती शंभुराजे यांचा राज्याभिषेक सोहळ्याने ही घटना प्रसंग ऐतिहासिक असल्याचे मान्यवरांनी सांगितले. दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दुग्धाभिषेक जलाभिषेक करून पूजन करण्यात आले.यावेळी अभिषेक अधिक्षक अभियंता महावितरण अंकुर कावळे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष आश्वीन वागळे, डॉक्टर गजेंद्र देशमुख, सुषमा देसाई, नेत्रदीप सरनोबत, रमेश मस्कर, हर्षजीत घाडगे, अजय शिंदे, निरीक्षक रमेश सरनाईक, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत गाजरे, शाहीर दिलीप सावंत ,शाहीर रंगराव पाटील, शिल्पकार शैलेंद्र डोंगरसाने, सतीश घारगे, लेखक सुजय देसाई, डॉक्टर जय मिराशी, चेतन आरमाळ, नगरसेवक ईश्वर परमार, एडवोकेट पृथ्वीराज राणे, प्रा. मधुकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पोवाडा सादर करण्यात आला.तसेच अंकुर कावळे, नेत्रदीप सरनोबत, प्रशांत गाजरे, सुषमा देसाई, यांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी नेत्रदीप सरनोबत म्हणाले पुढील वर्षी राज्याभिषेक सोहळा संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पापाची तिकटी येथे उभारून केला जाईल यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.दरम्यान
मराठा सेवा संघाच्या शिवधर्म दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर संभाजी महाराजांच्या जीवनावरील चरित्राचे वाटप (शंभू जागर) करण्यात आले. संभाजी ब्रिगेड कामगार संघटना युनियन रसिका मोटर्स यांच्यातर्फे दूध वाटप करण्यात आले
प्रस्ताविक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी केली .सूत्रसंचलन संभाजी साळोखे यांनी केले.
कार्यक्रमास प्रमुख संयोजक विकी जाधव ,अभिजीत कांजर, भगवान कोईगडे ,योगेश जगदाळे, रणजीत देवणे, प्रमोद पाटील ,सागर शिंदे, रमेश यादव ,निकिता माने ,डॉक्टर नामदेव निट्टूरकर ,साताप्पा अस्वले ,अरुण जकाते, आदित्य शिंदे ,सोमनाथ शिंत्रे, राम जाधव ,अमृत पाटील ,यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार आश्वीन वागळे यांनी मानले.