कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आज प्लॅस्टिकचा वापर करणा-या सहा व्यापाऱ्यांकडून तीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्लॅस्टिक व थर्माकोल इत्यादीपासून तयार केलेले वस्तूंचा वापर, वितरण, साठवणूक, घाऊक, किरकोळ विक्री तसेच उत्पादन करणारे नागरिक व व्यावसायिक यांच्यावर महापालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत आज रंकाळा रोड, शाहूपरी व पंचशील हॉटेल परिसर येथील इन्टाईस गेम झोन, राजेंद्र कोळी, हॉटेल कैलरु, शक्ती प्लावर्स, तुलीप प्लावर्स व आवंती वडा सेंटर यांच्यावर प्लास्टिक विरोधी पथकाने कारवाई करुन प्रत्येकी रु.5000/- प्रमाणे एकूण रु. 30,000/- रुपये दंड वसूल केला. सदरची कारवाई आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागीय आरोग्य निरीक्षक राहूल राजगोळकर, निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे, मुनीर फरास, करण लाटवडे, श्रीराज घोळकर, सुशांत कावडे, नंदकुमार पाटील यांनी केली.