कोल्हापूर : भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीने अभ्यास यशप्राप्ती व परीक्षा धैर्य याविषयी घेण्यात आलेल्या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभाल.
प्रास्ताविका मध्ये ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले यांनी ग्रंथालयामार्फत मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमा बद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ताणमुक्त परीक्षा कशी द्यावी यासाठी ही कार्यशाळा आयोजित करत असल्याचे नमूद केले. सदर कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा येथील डॉक्टर संजीवकुमार पाटील यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर संजीवकुमार पाटील यांनी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी पहिला आपले ध्येय निश्चित असले पाहिजे त्यासाठी नियोजन जिद्द ,चिकाटी,ध्यान, एकाग्रता इत्यादी बाबी कशा अवगत करता येतात त्यासंदर्भातले उपयुक्त अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली. दरम्यान परीक्षेच्या काळामध्ये पालकांनी देखील विद्यार्थ्यांशी कशापद्धतीने सलोखा राखावा व विद्यार्थ्यांकडून कशा पद्धतीने त्यांचा बौद्धिक विकास करून घ्यावा या विषयावर संबोधित केले. कार्यशाळेनंतर पालक व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंका व प्रश्न यांची समर्पक उत्तरे डॉक्टर संजीवकुमार पाटील यांनी दिली. आभार ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी मानले.
सदर कार्यशाळेसाठी सचिन साळोखे, जयदीप मोरे, विजयसिंह पाटील, कृष्णा आतवाडकर, योगेश चिकोडे, पूजा कुलकर्णी आदी उपस्थित होते.