कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी काल नियुक्ती झाल्यानंतर ना. सतेज पाटील आज सकाळी कोल्हापूरात दाखल झाले. यावेळी रेल्वेस्थानकावर कार्यकर्त्यांनी त्यांचं मोठया उत्साहात स्वागत केले.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची बुधवारी पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली. त्यानंतर आज सकाळी नामदार सतेज पाटील यांचं ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह कोल्हापूरात आगमन झालं. यावेळी कार्यकर्त्यांनी उत्साही वातावरणात त्यांचं स्वागत केलं. उपमहापौर संजय मोहिते, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, बाजार समितीचे सभापती दशरथ माने, महापालिका शिक्षण मंडळ सभापती श्रावण फडतारे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे, माजी महापौर सागर चव्हाण, माजी स्थायी सभापती सचिण चव्हाण, खासगी शिक्षक संघटनेचे नेते भरत रसाळे, युवक काँग्रेसचे दिपक थोरात, पार्थ मुंडे यांसह महापालिकेचे नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येनं यावेळी उपस्थित होते.