कोल्हापूर /प्रतिनिधी
कालकथित माजी खासदार एस.के.डिगे मेमोरियल फौंडेशनच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजपयोगी विविध क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज ,राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतीबा फुले,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर काम करणाऱ्या मान्यवरांना एस.के.डिगे यांच्या १०७ व्या जयंतीचं औचित्य साधून रविवार दिं.१२ एप्रिल रोजी आयोजित भीम फेस्टिवल मध्ये समाजरत्न भीमक्रांती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहेत.तर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमित्त दिं.११ ते १४ एप्रिल दरम्यान भीम फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलयं.दरम्यान डिगे फौंडेशनचे समाजरत्न भीमक्रांती पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा संस्थाध्यक्ष समाजभूषण सदानंद डिगे यांनी पत्रकार परिषदेत केलीयं.
माजी खासदार एस.के.डिगे मेमोरियल फौंडेशनच्या वतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सह फूले ,आंबेडकर यांच्या विचारावर सामाजिक कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांना भीमक्रांती समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येतं.यंदा ही एस.के.डिगे यांच्या १०७ व्या जयंतीचं औचित्य साधून रविवार दिं.१२ एप्रिल २०२० रोजी शाहू स्मारक भवन येथे आयोजित भीम फेस्टिवल कार्यक्रमामध्ये समाजातील विविध मान्यवरांना भीमक्रांती समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.दरम्यान विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमित्त दि.११ ते १४ एप्रिल कालावधीत भीम फेस्टिव्हल चं आयोजन करण्यात आलयं. यामध्ये संसद भवन प्रतिकृती ,पुरस्कार, व्याख्यान ,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,अंध व अपंग मुलांना भोजनदानासह प्रबोधनात्मक आतषबाजी, चित्ररथ मिरवणूक असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचं सदानंद दिगे यांनी सांगितलं.
पत्रकार परिषदेला धोंडीराम कांबळे, सचिव महादेव कांबळे, अशोक भास्कर, प्रभाकर कांबळे, हेमंत कांबळे, प्रा.अतुल कांबळे, सतिश कुरणे, योगेश दिगे,कैलास शिंंगे ,राजू नाईक, विकी माजगावकर, विकी कांबळे उपस्थित होते.
समाजरत्न भीमक्रांती पुरस्कार मुर्ती :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन वविकास केंद्र शिवाजी विद्यापीठ संचालक प्रा.डॉ. श्रीकृष्ण महाजन,पटकथा लेखिका शिल्पा कांबळे ,जेष्ठ साहित्यिक व लेखक प्रा.डॉ. शरद गायकवाड ,मुलनिवासी संघ केंद्रीय कार्यकारणी सदस्या डॉ. दिपा श्रावस्ती,अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष संतराव मुळीक,सामाजिक कार्यकर्त्या प्रा.सुवर्णा कांबळे-यादव, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, बौद्ध धर्म प्रसारक तात्यासाहेब कांबळे,आपत्कालीन जीवरक्षक दिनकर कांबळे, पालीभाषा तज्ञ व उपासक प्रसाद गायकवाड.