कोल्हापूर /प्रतिनिधी
मूळ आदिवासी अनुसूचित जमातींच्या लोकांना महादेव कोळी जमातीचे दाखले मिळावेत,मालकी हक्काच्या जमीनीवर महादेव कोळी ३६-३६ ‘अ ‘च्या नोंदी करून द्याव्यात आणि जात पडताळणी नि:पक्षपाती करुन या समितीवर निवृत्त न्यायाधीशांची निवड करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी आज अखिल भारतीय कोल्हापूर जिल्हा कोळी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश महामोर्चा काढण्यात आलायं.मोर्चा दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर येताचं सरकारच्या महादेव कोळी समाज विरोधी धोरणाच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आलीत. तर कोळी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं ठिय्या मांडून आपल्या मागण्यांचा आक्रोश व्यक्त केला.दरम्यान सदर मागण्यांचं निवेदन शिष्टमंडळाच्या वतीनं महसूल विभाग उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांना देण्यात आलं.यावेळी बोगस आदिवासी नावाखाली मूळ खऱ्या आदीवासींना संपवणारा राज्य शासनाचा २१ डिसेंबर २०१९ चा शासन निर्णय रद्द करावा ,मूळ आदिवासी अनुसूचित जमातींच्या लोकांना महादेव कोळी जमातीचे दाखले मिळावेत,मालकी हक्काच्या जमीनीवर महादेव कोळी ३६-३६ ‘अ ‘च्या नोंदी करून द्याव्यात आणि जात पडताळणी नि:पक्षपाती करुन या समितीवर निवृत्त न्यायाधीशांची निवड करण्यात यावी या या प्रमुख मागण्यांसह अन्य मागंण्या करण्यात आल्या.तर शासनानं तात्काळ आदिवासी महादेव कोळी समाजाच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही यावेळी महादेव कोळी समाजाच्या वतीने जिं.पं.सदस्य विजय भोजे यांनी यावेळी दिलायं.
मोर्चात अखिल भारतीय कोळी समाज जिल्हा अध्यक्ष प्रा.बसवंत पाटील,प्रा.विजय मुत्नाळे ,दत्तात्रय कोळी, राजेंद्र कोळी, तेजस कोळी यांच्या सह जिल्ह्यातील महादेव कोळी समाजातील नागरिक, महिला हजारोंच्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या.