कोल्हापूर /प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनी बळकावणाऱ्या मंगळवार पेठेतील शहा नावाच्या खासगी सावकारासह त्याच्या नातेवाईकांच्या विरोधात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल झाला आहे. त्यानुसार पोलीस संशयित खासगी सावकारांची चौकशी सुरु असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यात आहे.
खासगी सावकार शहा व त्याच्या पाच नातेवाईकांनी पन्हाळा तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्यांना ५ टक्के व्याजाने पैसे देऊन, त्यांच्या जमिनी स्टंप पेपरवर लिहून घेतल्या आहे. शेतकऱ्यांनी पैसे परत करून ही संबधित सावकार शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे पेपर परत न देता. त्यांच्याकडून आणखीन रकमेची मागणी करत आहेत. असे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे दाखल झालेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. याची पोलिसांनी गंभीर दाखल घेऊन. संशयित खासगी सावकार शहासह सावकारी करणाऱ्या पाच नातेवाईकांची चौकशी सुरु केली आहे. त्यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार असेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. खासगी सावकारीतून शहा याने आणखीन कोणाची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला असल्यास त्यांनी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल करावी. असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.