कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ अर्थात गोकुळ संघाची निवडणूक जाहीर झाल्यानं सत्ताधारी गटाकडून सत्ता टिकवण्यासाठी विरोधी गटाकडून गोकूळवर सत्ता मिळवण्यासाठी मोठ्या हालचाली चालू आहेत. दरम्यान आज सत्ताधारी गटातच फूट पडल्यानं एकच खळबळ उडाली.गोकुळ संघाचे माजी चेअरमन विश्वास पाटील,अरुणकुमार डोंगळे आणि
शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर या तीन संचालकांनी सत्ताधारी गटाच्या विरोधात दंड थोपटून वेगळी चूल मांडली. त्यामुळे सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी नाट्यपूर्ण घडामोडी घडत असून सोमवारी तीन संचालकांनी सत्ताधारी गटाच्या विरोधात दंड थोपटले माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील (आबाजी) , अरुणकुमार डोंगळे आणि संघाचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांनी एकत्र येऊन स्वतंत्ररीत्या सहायक दुग्ध उपनिबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांच्याकडे ठराव दाखल केल्यामुळे सत्ताधारी गटाला जबर धक्का बसला आहे. आज सकाळी नऊ वाजता तिघेजण कार्यकर्त्यांसमवेत ४९७ ठराव दिले, यामध्ये विश्वास पाटील यांनी 293 तर अरुण डोंगळे यांनी 204 ठराव दाखल केले .उद्या पर्यंत आणखी शंभर ठराव देणार असल्याचे विश्वास पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना डोंगळे, पाटील यांनी संघाच्या हितासाठी आम्ही एकत्रित झालो असून आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत असल्याचे सांगितले.
यावेळी, जि. प. सदस्य सुहास सातपुते, तुकाराम पाटील, धीरज डोंगळे, सुनील पाटील माजी पंचायत समिती सदस्य, सचिन पाटील, राहुल पाटील, अनिल सोलापूर आदी उपस्थित होते.