कोल्हापूर /प्रतिनिधी – महापुराची सर्वाधिक झळ बसलेल्या हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी येथे महिला सबलीकरण आणि आप्तकालीन पुनर्वसन क्षेत्रात कार्यरत लुपिन फौंडेशनच्यावतीने मंगळवार दि . २१ जानेवारी रोजी पुनरूत्थानकार्य लोकार्पन सोहळा संपन्न होत आहे . यामध्ये १२ पुरग्रस्त कुटुंबियांना नवीन सुपूर्तीसह अंगणवाडी – जिल्हा परिषद शाळा नूतनीकरणसह विविध १२ सेवा कार्यपूर्तीचा हा सोहळा कणेरी सिद्धगिरी मठाचे परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी , पुणे विभागीय आयुक्त डॉ . दिपक म्हैसकर , लुपिनचे कार्यकारी संचालक सीता रामगुप्ता , खा . धैर्यशिल माने , आ . विनय कोरे , राजूबाबा आवळे , जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल , जिल्हा पोलिसप्रमुख अभिनव देशमुखसह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हापरिषद प्रशाला प्रांगणात दुपारी बारा वाजता संपन्न होत आहे . कोल्हापूर , सांगली , सातारा जिल्हयातील पुरग्रस्तांसाठी लुपिन फौंडेशनने शास्त्रशुद्ध माहिती सर्वेक्षणासह विविध अत्यंत गरजेच्या सेवा – सुविधा महापुराच्या नुकसानीनंतर उपलब्ध करून दिल्या आहेत . यामध्ये शेतकरी कट्ट्याचे बांधकाम , बसथांबा शेडचे बांधकाम , पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे नूतणीकरण , २६ कुटुंबियांना व्यावसायिक उभारणीसाठी मदत अपंग कुटबाना विशेष मदत , औषधे वाटप आदी विविध १२ पलूना निलवाडी गावात महापुराच्या नुकसानीनंतरचे अत्यावश्यक काम पूर्ण केले आहे . या निमित्ताने आयोजित समारंभात माजी आ . सुजित मिणचेकर , जिल्हापरिषद अध्यक्ष बजरंग पाटील , सदस्या सौ . पुष्पा आळतेकर , कृषी महाविद्यालय पुण्याचे डॉ . आर . डी . घाटगे , विशाल महापुरे , श्रीमती सरितादेवी मोहिते , सलोचना देशमख आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत . तरी या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन निलेवाडीच्या सरपंच वर्षा सुभाष माने , उपसरपंच तानाजी जाधव , ग्रामविकास अधिकारी पी . एन . पाटील यांच्यासह ग्रामस्त आणि संयोजक एनजीओ लुपिन फौंडेशनने केले आहे .