कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर येथील दै.तरुण भारतचे फोटोग्राफर इम्रान गवंडी यांच्या इयत्ता ९वीत शिक्षण घेणाऱ्या मुलगा रेहान गवंडी याच्यावर एका खाजगी दवाखान्यात अपेंडीसची अंत्यत गुतांगुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून आत्तापर्यंत ३५हजार रुपये खर्च आला आहे. तर रेहान अजून दवाखान्यात उपचार घेत असून पुढील उपचाराचा खर्च सुमारे एक लाखाहून अधिक येण्याचा अंदाज आहे. तरी फोटोग्राफर इम्रान गवंडी यांची परिस्थिती अंत्यत गरीबीची असून त्यांना हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थानी पुढे येवून इम्रान गवंडी यांना आर्थिक मदत करावी असं आवाहन समाजमन बहुद्देशीय सामाजिक संस्था आणि गवंडी कुटुंबीयांकडून करण्यात आलयं.
समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींच ,घटनांच प्रतिबिंब वर्तमानपत्रांसह विविध प्रसारमाध्यामातून प्रसिद्ध होत असतं.तर या घटनांच वार्तांकन पत्रकार, छायाचित्रकार वेळेच भान न ठेवता सदैव करत असतात.तसेच समाजातील अनेक गरजू,गरीब व्यक्ती, युवक,विद्यार्थ्यांसह रुग्णांना वेळोवेळी प्रसंगानुसार आर्थिक मदत करण्याचे बातमीतून आवाहन करून आर्थिक मदत मिळवून देण्यात हेच पत्रकार, छायाचित्रकार अग्रेसर असतात.त्यामुळं एखाद्या पत्रकार, छायाचित्रकारांवर काही प्रसंगानं अशी वेळ आल्यास समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेवून त्यांना मदत करणही काळाची गरज आहे. अशीच परिस्थिती दै.तरुण भारतचे छायाचित्रकार इम्रान गवंडी यांच्या कुटुंबीयांवर आली आहे. इम्रान गवंडी यांचा इयत्ता ९वी शिक्षण घेत असलेला मुलगा रेहान याला काही महिन्यापूर्वी अंपेडीस झाल्याचं निधान झालं.त्याच्यावर कोल्हापूरातील एका खाजगी दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्याला काही दिवसात पुन्हा त्रास होवू लागल्याने सोनोग्राफी केली असता त्याच्या आतड्याला इन्फेक्शन झाल्याच समजलं.त्यामुळे रेहानवर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर काही दिवस त्याला बरं वाटलं.मात्र चार महिन्यापूर्वी पुन्हा रेहानला त्रास होवू लागल्यानं सोनोग्राफी करण्यात आली. त्यामध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे समोर आलन.त्यानुसार काही दिवसांपूर्वी त्याच्यावर अंत्यत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. आतापर्यंत ३५ हजार रुपये खर्च आला असून रेहान अजून दवाखान्यात उपचार घेत आहे. गवंडी कुटुंबीयांना शस्त्रक्रिया आणि रेहानच्या पुढील उपचारासाठी सुमारे एक लाखाहून अधिक खर्च येणार असून परिस्थिती गरीबीची असल्याने गवंडी कुटुंबीयांना हा खर्च परवडणारा नाही.त्यामुळं नेहमी समाजहित डोळ्यासमोर ठेवून उद्धात भावनेनं छायाचित्रकार म्हणून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या इम्रान गवंडी यांच्या मुलाच्या शस्त्रक्रियेवरील खर्चासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनी इम्रान गवंडीच्या अकाउंट नं.३८९४१०८०००४० या खात्यावर आपली आर्थिक मदत जमा करावी तसेच अधिक माहितीसाठी महेश गावडे ९८२३७६७८५८या नंबरशी संपर्क साधण्याच आवाहन गवंडी कुटुंबासह समाजमन बहुद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.