कोल्हापूर /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने अन्यायकारक वीजदरवाढ रद्द करावी, दरवाढीची सुनावणी कोल्हापूरात घेण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागंण्यासाठी कोल्हापूरात वीजवितरणाच्या मध्यवर्ती विभागीय कार्यालयासमोर कार्याध्यक्ष समीर नदाफ यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जनशक्ती च्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आलीतं. तर सदर मागण्यांचे निवेदन अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजित अस्वले यांना देण्यात आलं. दरम्यान अन्यायकारक वीज दरवाढ विरोधात आंदोलकांनी प्रतिकात्मक मेणबत्तीचं तोरण कार्यालयाच्या गेटला बांधून निषेध व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने प्रस्तावित वीजदरवाढ तात्काळ रद्द करावी, वीज नियामक आयोगाची सुनावणी कोल्हापूरात घेण्यात यावी, स्थिर आकार ५० टक्यांनी कमी करावेत,५० युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांना इतर सर्व आकारातून सवलत द्यावी,३० युनिट पर्यंत वापर असणाऱ्या वाणिज्यिक ग्राहकांना घरघुती दराने वीजदर आकारणी करण्यात यावीत,वीज शुल्काच्या नावाने सुरू असणारी सावकारी व्याज पद्धत त्वरित बदलावी, कंपनीच्या खर्चाचा बोजा ग्राहकांवर न लादता आस्थापनाखर्चात कपात करावी आदी मागण्या करण्यात आल्या.
आंदोलनात कोल्हापूर जनशक्ती चे पदाधिकारी, कार्यकर्ते, वीजग्राहक उपस्थित होते.