सोनी सबवरील जादुई काल्पनिक सुपरहिरोची मालिका ‘बालवीर रिटर्न्स’ भारताच्या जनरेशन झेडपर्यंत पोहोचत त्यांना पुढाकार घेऊन ‘बालवीर के पृथ्वी रक्षक’च्या भूमिकेत पृथ्वीच्या रक्षणामध्ये बालवीरला मदत करण्याचे आवाहन करत आहे. मुंबई, नवी दिल्ली, अहमदाबाद व बडोदा या ४ शहरांमधील २५० अधिक शाळा या उपक्रमाचा भाग होणार आहेत.
या उपक्रमाचा भाग म्हणून इयत्ता ३री ते ८वीमधील विद्यार्थ्यांना बालवीरसोबत पृथ्वीच्या रक्षणासाठी त्याच्या प्रयत्नामध्ये सामील होण्याची संधी मिळेल. ज्याप्रमाणे बालवीर प्रत्येक आव्हानावर मात करत त्याच्या साहसांमधील अवघड परीक्षा पार करतो, अगदी त्याप्रमाणेच लहान मुलांना बालवीरच्या पृथ्वी रक्षक सेनेमध्ये सामील होण्याकरिता त्यांची क्षमता सिद्ध करण्यासाठी एक लहान परीक्षा द्यावी लागणार आहे. पर्यावरणीय समस्यांबाबत माहिती आणि त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांचे सर्जनशील विचार याबाबत माहिती, बुद्धिमत्ता व सर्जनशीलता या तीन घटकांच्या आधारावर लहान मुलांची चाचणी घेण्यात येईल. प्रतिसादांच्या आधारावर प्रत्येक शाळेमधून दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल आणि त्यांना ‘बालवीर के पृथ्वी रक्षक’चे नाव देत ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि गिफ्ट वाऊचर देण्यात येईल.
वीर लोक व काल लोक या दोन जादुई विश्वाच्या पार्श्वभूमींना सादर करणारी ‘बालवीर रिटर्न्स’ ही भारतीय टेलिव्हिजनवरील भारतीयांची सर्वात लोकप्रिय काल्पनिक मालिका आहे. या मालिकेमध्ये देव जोशी, पवित्रा पुनिया व शर्मिली राज यांसारखे प्रतिभावान कलाकार आहेत. नुकतेच या मालिकेला गुगलचा २०१९ साठी वार्षिक ट्रेण्ड्स अहवाल ‘इअर इन सर्च’च्या मते जगात सर्वाधिक सर्च करण्यात आलेला भारतीय टेलिव्हिजन शो म्हणून मान्यता मिळाली आहे. या भव्य यशामधून दिसून आले की ‘बालवीर’ ही जगात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या टेलिव्हिजन मालिकांमध्ये हिंदी सामान्य मनोरंजन चॅनेलमधील एकमेव भारतीय टेलिव्हिजन मालिका आहे. या कॅम्पेनच्या माध्यमातून सोनी सब अत्यंत लोकप्रिय पात्रांना चाहत्यांच्या अधिक जवळ घेऊन जाण्याचा आणि बालवीरची प्रेरणा, हेतू, नैतिक मूल्ये, नीतिमत्ता व व्यक्तिमत्त्व दाखवत अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते.
प्रतिक्रिया:
वैशाली शर्मा, प्रमुख, विपणन व कम्युनिकेशन्स, सोनी सब
”या उपक्रमाला आकार मिळत असल्याचे पाहून आम्हाला आनंद होत आहे. हा उपक्रम आमच्या कार्यक्रमांमधून सतत दिसून आलेले आमचे तत्त्व ‘खुशियोंवाली फिलिंग’शी संलग्न आहे. आमचा नेहमीच विश्वास राहिला आहे की बालवीर ही फक्त एक मालिका नसून एक लीजण्ड आहे. नेहमी सर्वांना आनंद देत चाहत्यांच्या या आवडत्या पात्राला त्यांच्यापर्यंत अधिकाधिक जवळ घेऊन जाण्याचा आणि देशाच्या तरूणांमध्ये मजेशीर पद्धतीने बालवीरचा उत्साह बिंबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो.”
रोमांचकारी साहसांचा अनुभव घेण्यासाठी पाहत राहा ‘बालवीर रिटर्न्स’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता
फक्त सोनी सबवर.