~ दुष्टाचा सुष्टावर विजय होईल का? विभिन्न दुनियेमधील दोन हिरो सुपर खलनायक तिम्नसा व जफरच्या दुष्ट हेतूंचा कशाप्रकारे सामना करतील ~
सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’ आणि ‘बालवीर रिटर्न्स’च्या चाहत्यांना रोमांचक राइडचा अनुभव मिळणार आहे. भारतीय टेलिव्हिजनवरील दोन सर्वात क्रूर खलनायक जगामध्ये सर्वात शक्तिशाली बनण्यासाठी एकमेकांशी सहयोग जोडण्याकरिता सज्ज आहेत. २७ जानेवारीपासून दुष्टतेची नवीन परिभाषा असणार आहे. सोनी सब ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’ आणि ‘बालवीर रिटर्न्स’ यांच्यामधील संबंध दाखवणार आहे.
भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन रत्नांची आवश्यकता असलेले सिंहासन मिळवण्याचा प्रयत्न करणारी तिम्नसा एक जादुई पोर्टल तयार करते. हे पोर्टल भूतकाळाला वर्तमानकाळाशी जोडते आणि तिला थेट बगदादमध्ये घेऊन जाते. ती शक्ती मिळवण्यासाठी अलाद्दिनशी लढणा-या जफरला भेटणार आहे. जगातील सर्वोत्तम शक्ती मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये जफर व तिम्नसा एकमेकांशी सहयोग जोडत आपली क्रूर सेना तयार करतात आणि स्थिती अत्यंत भयानक रूप घेते.
दुसरीकडे सुपरहिरोज बालवीर व अलाद्दिन त्यांच्यासमोर येणा-या प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांना जगाला वाचवण्याचा अद्वितीय मार्ग सापडतो. ‘दिल से बुलाया – बालवीर और अलाद्दिन आया’ हा युद्धातील नवा नारा असणार आहे. बगदादमध्ये भारतीय टेलिव्हिजनवरील दोन सर्वात लोकप्रिय हिरो आणि दोन सर्वात दुष्ट पात्रांमधील मोठे युद्ध पाहायला मिळणार आहे.
कोणाचे जीवन धोक्यात आहे, अलाद्दिनचे की बालवीरचे? की नेहमीप्रमाणे सुष्टाचाच विजय होईल? तिम्नसाकडे एक रत्न आहे. ती इतर दोन रत्न मिळवण्यामध्ये यशस्वी होईल का की अलाद्दिन व बालवीरच्या सुपरशक्ती तिम्नसा व जफरच्या हेतूंना मोडून काढतील? अनेक रोमांचकारी प्रसंग पाहायला मिळणार आहेत. आगामी एपिसोड्स रोमांचक अॅक्शन, उलगडा करतील आणि प्रेक्षकांसमोर चांगले व वाईटामधील पूर्णत: नवीन युद्ध सादर करतील?