सामाजिक कार्यातून शिवसेनाप्रमुखांना शिवसेना शहर कार्यकारणीच्यावतीने आदरांजली
कोल्हापूर /प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला. त्याच सूत्रानुसार शिवसेना आजपर्यंत काम करीत आली आहे. यामध्ये मोफत अॅम्ब्युलन्स सुविधा, आरोग्य शिबिरे, ग्रंथालये, यासह रक्तदानाचा विश्वविक्रम करणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार जोपासून त्यातून प्रेरणा घेत त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगानेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त यावर्षी राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने “हृदय विकाराने ग्रस्त जन्मजात शिशूंच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे” आयोजन आले होते. या सामाजिक कार्यातून शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. या शिबिराअंतर्गत हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया मुंबई, ठाणे स्थित नामांकित रुग्णालयात मोफत करण्याच्या दृष्टीने नाव नोंदणी करण्यात आली. यासह त्यांना या शस्त्रक्रिया व उपचार पद्धतीबाबत माहिती देण्यात आली.
सकाळी शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथे शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिकांच्यावतीने शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी “जय भवानी जय शिवाजी”, “शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे अमर रहे”* अशा घोषणांनी शिवसेना शहर कार्यालय परिसर दणाणून सोडला.
यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या जयंती निमित आयोजित केलेल्या शिशूंच्या हृदय शस्त्रक्रिया नोंदणी शिबिरास सुरवात करण्यात आली. लहान मुलांच्या अशा हृदय शस्त्रक्रियांना लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित असतो. अनेक वेळा आपल्या कमी उत्पनातून इतकी मोठी रक्कम कुठून आणायची असा प्रश्न पालकांना पडतो. पैशापेक्षा मुलाचे प्राण महत्वाचे म्हणून उसनवारी करून, दागदागिने व मालमत्ता गहाण ठेवून पैसे उभे केले जातात. अशा गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या मुलांना नवजीवन जगता यावे, यासाठी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त “हृदय विकाराने ग्रस्त जन्मजात शिशूंच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे” आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेनाशहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिली. शिबिरामध्ये नांव नोंदणी झाल्यानंतर तात्काळ त्यांचे मेडिकल रिपोर्ट तात्काळ मुंबई, ठाणे येथील नामांकित हॉस्पिटला पाठवून मोफत तपासणी व मोफत शस्त्रक्रियेची पुढील प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे,
यावेळी युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, जेष्ठ शिवसैनिक दीपक गौड, महिला आघाडी शहरप्रमुख सौ.मंगलताई साळोखे, माजी शहरप्रमुख सौ.पूजा भोर, सौ.पूजा कामते, रुपाली कवाळे, सौ.मीनाताई पोतदार, सौ.श्रद्धा यादव, सौ. अश्विनी मोहिते, सौ.सुषमा हंकारे, सौ. सारिका कांबळे, सौ.अश्विनी भोसले, जयवंत हारुगले, रघुनाथ टिपुगडे, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, सुनील जाधव, विशाल देवकुळे, धनाजी दळवी, किशोर घाटगे, दीपक चव्हाण, राहूल चव्हाण, सुनील खोत, अश्विन शेळके, भाई जाधव, ओंकार परमणे, अंकुश निपाणीकर, गजानन भुर्के, राजू काझी, युवासेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, अविनाश कामते, दादू शिंदे, सौरभ कुलकर्णी, विनय क्षीरसागर, निलेश हंकारे, राज अर्जुनिकर, दिनेश साळोखे, यशवंत पाटील, विशाल कावळे, किरण पाटील, विशाल पाटील, कृपालसिंह रजपूत आदी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, अंगीकृत संघटना पदाधिकारी व महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.