कोल्हापूर /प्रतिनिधी
करवीर निवासिनी आई अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिराच लवकरच स्ट्रक्चरल आॅडीट करण्यात येणार असून पुढील आठवड्यात प्रत्यक्ष आॅडीटच्या कामास सुरुवात होईल अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
साडेतीन शक्तीपीठ पैकी एक पीठ असलेल्या कोल्हापूरातील करवीर निवासिनी आई अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या दर्शनासाठी राज्यासह देशातून भक्तांची मोठी मांदियाळी असते.तर ही दोन्ही ही
मंदिरे पूरातन काळातील असून मंदिराची सद्यस्थिती काय आहे याची माहिती घेवून मंदिराचा विकास करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने लवकरच स्ट्रक्चरल आॅडीट करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात मुंबई येथील नामवंत एका कंपनीकडून नाममात्र मानधनावर मंदिराच्या आॅडीट कामास प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याचे देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. तर करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरासाठी १२ कोटी तर दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरासाठी १२कोटी निधींची तरतूद करण्यात आली असून आॅडीटनंतर या दोन्ही मंदिराच्या विकास कामास सुरवात होणार आहे. तसेच मंदिर संवर्धनासाठी या आॅडीट अहवालाचा उपयोग होणार असल्याच महेश जाधव यांनी यावेळी सांगितले.