प्रेक्षकांना लवकरच अभिषेकबाबत एक धक्कादायक सत्य समजणार आहे. सर्वांचा लाडका अभिषेक (अक्षय केळकर) हा अण्णांचा दत्तक घेतलेला मुलगा आहे. त्याची खरी आई रसिला आपल्या मुलाला परत घेऊन जाण्यासाठी २५ वर्षांनंतर परतली आहे. अभिनेत्री पल्लवी प्रधानने रसिलाची भूमिका साकारली आहे. मालिका लवकरच प्रेक्षकांना द्वारका शहराच्या एका मन मोहून टाकणा-या ठिकाणी घेऊन जाणार आहे. याच ठिकाणी अभिषेक व गायत्री (अक्षिता मुदगल) आपल्या कुटुंबांसोबत हनीमूनसाठी गेले आहेत.
रसिलाने आपला मुलगा परत मिळवण्यासाठी अण्णांना (देवेन भोजानी) संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे, ज्यामुळे ते चिंताग्रस्त होतात. अण्णा नाराज होतात. त्यांचा मुलगा अभिषेक दूर जाण्याची त्यांची इच्छा नसते. रसिलाला हुलकावणी देण्यासाठी अण्णा संपूर्ण गोखले व ठक्कर कुटुंबांना त्यांच्या हनीमून ट्रिपला जाण्यास भाग पाडतात. दुसरीकडे अभिषेक व गायत्री अखेर हनीमूनला जाण्यासाठी आणि एकमेकांसोबत चांगला वेळ व्यतित करण्यासाठी उत्सुक आहेत.
यादरम्यान रसिला गोखले परिवारामध्ये पोहोचते. पण तिला समजते की, संपूर्ण परिवार द्वारकाला गेले आहेत. ती समजून जाते की तिचा मुलगा अभिषेकला तिच्यापासून दूर ठेवण्यासाठी अण्णा पळ काढत आहेत. रसिला द्वारकाला जाऊन अण्णा व अभिषेकचा सामना करण्याचे ठरवते.
अभिषेक रसिला उलगडा करणा-या सत्याचा कशाप्रकारे सामना करेल? अण्णा अभिषेकला तिच्याकडे सोपवतील का? सत्याचा उलगडा झाल्यानंतर अभिषेकची प्रतिक्रिया काय असेल? आगामी एपिसोड्समध्ये सर्व प्रश्नांचा उलगडा होईल आणि तणावग्रस्त घटना पाहायला मिळणार आहेत.
रसिलाची भूमिका साकारणारी पल्लवी प्रधान म्हणाली, ”मी २०११ पासून सोनी सबशी जुडलेली आहे. मी सोनी सबसोबत काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहे. माझी नेहमीच ‘भाखरवडी‘ सारख्या मालिकेमध्ये काम करण्याची इच्छा होती. ही मालिका विनोदी असून माझ्या अंतरिक गुणांना समोर आणते. माझी भूमिका रसिला ही अत्यंत भावनिक व मधुर आहे. तिचे पूर्वीपासून अण्णांसोबत चांगले नाते आहे. ती आता तिचा मुलगा अभिषेकला परत मिळवण्यासाठी अण्णांच्या जीवनात परतली आहे. या रहस्यामुळे मालिकेला आणि पात्रांच्या जीवनांना कोणते वळण मिळते हे आगामी एपिसोड्समध्ये पाहायला मिळेल.”
अण्णांची भूमिका साकारणारा देवेन भोजानी म्हणाला, ”अण्णा चिंताग्रस्त व घाबरलेला आहे. त्याची त्याचा मुलगा अभिषेकला गमावण्याची इच्छा नाही. अभिषेकची खरी आई रसिलाला एकेकाळी दिलेले वचन मोडणे, हे त्यांच्या तत्त्वाविरूद्ध आहे. अण्णा व रसिला यांच्यामध्ये गतकाळात चांगले संबंध होते. पण आता ते अत्यंत भावनिक झाले आहेत आणि रसिलापासून लपण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी एपिसोड्समध्ये भावनांचा उहापोह पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक आम्ही त्यांच्यासाठी सादर करत असलेले अचंबित करणारे क्षण पाहण्याचा निश्चितच आनंद घेतील. आम्ही गुजरातमधील द्वारका येथे शूटिंग करत आहोत आणि हे सीक्वेन्स शूट करण्यासाठी यासारखे चांगले ठिकाण कोणतेच नसते. तर मग मालिका पाहत राहा.”
पहा प्रतिभावान पल्लवी प्रधानला रसिलाच्या भूमिकेत आणि सुंदर द्वारका शहर पहा ‘भाखरवडी‘मध्ये दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त सोनी सबवर