कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर येथील श्री त्र्यंबोली विद्यालयात भव्य शालेय बाजार व हळदीकुंकू समारंभ पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटन जैन कॉनवे जे रोड कॉनवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रिसटीन वुमन्स हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉक्टर सचिन कुलकर्णी आणि स्वाती कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बाजार महोत्सवामध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध वस्तू फळे, फळ भाज्या तसेच अनेक प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडले होते.या मेळाव्याला साक्षात बाजाराचे स्वरूप आले होते. या मेळाव्यास परिसरातील नागरिकांसह पालकांनी भेट देऊन मनमुराद आनंद घेतला.
सदरचा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पार पडला. भागातील नगरसेविका शोभा कवाळे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष सौ जहिदा मुजावर, केंद्र मुख्याध्यापक पिंगळे , करवीर प्रशाळेचे सर्व विध्यार्थ्यांच्या बरोबर, एस डी पाटील , अमनगी सर, हे आवर्जून उपस्थित होते. सदरच्या उपक्रमाचे आयोजन सुप्रिया चव्हाण, मृणाल गावडे, चंद्रकांत पाटील यांनी उत्तमरित्या पार पाडले. या कार्यक्रमात सौ प्रिती कांबळे, सौ शुभांगी सावंत, शीतल जाधव, स्वाती रास्ते, सौ लक्ष्मी निकम सर्व शिक्षकांचा सक्रिय सहभाग होता.