कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात तीन लाखाहून अधिक केसरी कार्डधारक आहेत .केंद्र सरकारच्या अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत त्यांना मे व जून महिन्यासाठी प्रतिमाणसी तीन किलो गहू प्रति किलो रुपये आठ प्रमाणे व दोन किलो तांदूळ प्रतिमानसी रुपये 12 प्रमाणे मिळणार आहे. परंतु त्यांना माहे एप्रिल 2020 साठी हे धान्य मिळणार नाही. कोरोना पार्श्वभूमीवर 25 मार्च पासून जिल्हा लॉकडाऊन आहे. तरी केसरी कार्डधारकांना ही एप्रिल महिन्या साठी हे धान्य द्यावे व अन्नसुरक्षा योजनेनुसार या अन्नधान्याचा सवलतीचा दर गहू रुपये दोन व तांदूळ रुपये तीन असा आहे त्याप्रमाणे धान्य वाटप करावे ,यासाठी राज्य शासनाला मी विनंती करतो की या अन्नधान्य वाटपात त्रुटी दूर कराव्यात जेणेकरून केसरी कार्डधारकांच्या वर अन्याय होणार नाही असे परखड मत भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.
केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोफत तांदूळ योजनेचा लाभ ही यापुढे केसरी कार्डधारकांना देणेत यावा. तसेच ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही या योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यावे असेही ते म्हणाले.
ते म्हणाले,धान्य वाटपाचेवेळी बऱ्याच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन होत नाही. तसेच काही दुकानदार या धान्यवाटपामध्ये गैरप्रकार करीत असल्याच्या बातम्या वृत्तपत्त्रातुन वाचावयास मिळत आहेत त्याची शहानिशा करून त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी.