महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला जोरदार प्रतिसाद*
इचलकरंजी: इचलकरंजी शहराला मोठ्या प्रमाणावर दूषित पाणीपुरवठा होत आहे. या शहराला स्वच्छ आणि...
कोल्हापूर-मराठी मनोरंजनाची ओळख बनलेला, ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र डोळे लावून पाहतो असा मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात भव्य आणि चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बाॅस मराठी’...
*इचलकरंजीला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी कटिबद्ध*
*इचलकरंजी, दि. ११:संपूर्ण देशभर वस्त्रनगरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजी शहराचा "भारताचे मँचेस्टर" असा लौकिक सर्वदूर आहे. एकूणच वस्त्रोद्योग...
कोल्हापूर (प्रतिनिधी):गर्दीने गजबजलेल्या रंकाळा तलावाच्या काठावर आज अनोखा उपक्रम रंगला. युवकांनी उपस्थित केलेल्या शहराच्या विकासासंदर्भातील प्रश्न आणि त्याला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी दिलेली...
कोल्हापूर, :भारतीय युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या स्मार्टफोन ब्रँड रियलमीने आज रियलमी १६ प्रो सिरीजचे अधिकृत अनावरण केले. प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमध्ये बेंचमार्क ठरलेल्या या सिरीजमध्ये...
चीफ डायटिशियन स्वाती अवस्थी, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर यांचे तज्ज्ञ मार्गदर्शन
भारतामध्ये मकर संक्रांत हा सण साजरा करण्याची तयारी सुरू झाली की घराघरात तिळ आणि गुळाचा...
मधुगंधा कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी यांचे लेखन व दिग्दर्शन आणि स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर यांचा अभिनय यांसाठी चर्चेत असलेल्या ‘लग्नपंचमी’ या धमाल विनोदी नाटक चा...
कोल्हापूर-नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात आणि आनंदात करण्यासाठी प्रेक्षकांवर अफाट प्रेम मिळवलेला कार्यक्रम "महाराष्ट्राची हास्यजत्रा" पुन्हा एकदा हास्याची धमाल घेऊन परत येत आहे. महाराष्ट्रातील लाखो...
भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे आज कोल्हापुरात आगमन झाले. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची तरूणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. त्यामुळे कृष्णराज महाडिक...
भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचेआज रविवारी १ मार्च रोजी कोल्हापुरात आगमन होत आहे. यानिमित्त त्यांचे करवीर नगरीत दुचाकी रॅलीने जल्लोषी स्वागत करण्याचा निर्धार आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केला आहे. या संबंधी खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये २ हजार दुचाकी स्वारांची रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र कृष्णराज महाडिक हे गेल्या पाच वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची ओळख दूरवर पसरली आहे. यापुर्वी त्यांनी फॉर्म्युला थ्री या आंतरराष्ट्रीय कार रेसिंगमध्ये उज्वल कामगिरी करत देश-विदेशातील लाखो नागरिकांची मने जिंकली आहेत. सर्वच क्षेत्रात खर्या अर्थाने युथ आयकॉन ठरलेल्या कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीवेळी सांगितले होते. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदी निवड केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान ठेवत, त्यांना युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्षपद दिलं. या निवडीनंतर राज्यभरातील नागरिकांकडून कृष्णराज महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तसेच राज्यभरातील पक्ष कार्यकर्ते, युवा वर्गात उत्साहाचं वातावरण आहे. युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे रविवार १ मार्च रोजी मुंबईहून कोल्हापुरात आगमन होत आहे. त्यांचे जल्लोषी स्वागत करण्याच्या दृष्टीने आज भाजपा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड होणे हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे. पक्षाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ते आपल्या कार्यक्षमतेने योग्य पध्दतीने पार पाडतील, तसेच पक्षाची भूमिका पटवून देणे आणि विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूरच्या परंपरेला साजेल असेच त्यांचे स्वागत व्हावे, अशी अपेक्षा देखील खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी स्वागत रॅलीसंबंधी माहिती दिली. दुपारी ४ वाजता छत्रपती ताराराणी चौकातून कृष्णराज महाडिक यांच्या स्वागत रॅलीला सुरूवात होणार आहे. या रॅलीत २ हजार पेक्षा अधिक दुचाकी स्वारांचा समावेश आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित होईल. त्यानंतर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कृष्णराज महाडिक पक्ष कार्यालयात शुभेच्छा स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमात जनतेने उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे. कृष्णराज महाडिक यांची निवड हा संपूर्ण कोल्हापूरचा सन्मान असल्याचेही विजय जाधव यांनी सांगितले. दरम्यान कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसंच विविध समित्यांवर निवड झालेल्यांचा सत्कार खासदार महाडिक यांच्या हस्ते झाला. यामध्ये विजय जाधव, सुनील वाडकर, हेमंत आराध्ये, आप्पा लाड, प्रा. जयंत पाटील, प्रशांत मोरे, प्रसाद जाधव, तानाजी पाटील यांचा समावेश होता. यावेळी जिल्हा परिषद राजवर्धन नाईक-निंबाळकर, नाथाजी पाटील, गटनेते मुरलीधर जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास आणि राष्ट्र उभारणीवर सातत्याने भर देणाऱ्या या ग्रूपतर्फे ३००० हून अधिक कर्मयोगींची नियुक्ती होणार
कोल्हापूर ----ट्रायडंट लिमिटेड ही ट्रायडंट ग्रूपची मुख्य कंपनी आणि...
चित्रपटगृहात घवघवीत यश मिळवल्यानंतर मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी या लोकप्रिय मराठी चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर होणार ~
कोल्हापूर: या वर्षाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती विद्यालय मराठी...
Recent Comments