आरबीआयने ५ मे २०२१ रोजी कोविडसंदर्भात केलेल्या महत्त्वाच्या घोषणेमधे व्हिडिओ बेस्ड कस्टमर आयडेंटिफिकेशन प्रोसेस (व्ही- सीआयपी) म्हणजेच व्हिडिओ- केवायसी नावाने ओळखल्या जाणाऱ्या सेवेची व्याप्ती विस्तारण्याचा निर्णय जाहीर केला. आरबीआयने ग्राहकांच्या अतिरिक्त विभागांचा त्यात समावेश करण्याचा सल्ला दिला असून त्याचबरोबर ग्राहकस्नेही उपक्रमाचा एक भाग म्हणून व्हिडिओ केवायसीच्या माध्यमातून नियमित कालावधीनंतर केवायसी अद्यावत करण्याची सुविधा देण्याची सूचना केली आहे.
त्याला प्रतिसाद देत आयडीबीआय बँकेने व्ही- सीआयपीद्वारे नियमित कालावधीनंतर केली जाणारी केवायसी अद्यावत करण्याची सुविधा लाँच केली आहे. हा उपक्रम जाहीर करताना उप व्यवस्थापक श्री. सुरेश खटनहार म्हणाले, ‘ग्राहकांना आता बँकेला भेट न देताही व्ही- सीआयपीच्या माध्यमातून त्यांचा केवायसी अद्यावत करता येणार आहे. ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या व्ही- सीआयपी लिंकद्वारे ही प्रक्रिया सुरू करता येईल. ही पूर्णपणे संपर्क विरहित प्रक्रिया आहे.’