कोल्हापूर, ता. ६ – प.प. कालिकानंदतीर्थ स्वामी समाधिस्थळाचे भूमिपूजन कल्लोळ येथे होऊन त्याचे काम सध्या गतीने सुरू आहे.प.प. कालिकानंदतीर्थ स्वामी सिद्धयोग न्यासच्या वतीने स्वामींच्या समाधिस्थळाचे बांधकाम करण्यात येत असून भूमिपूजनानंतर मोठ्या गतीने काम सुरू आहे.
दरम्यान, न्यासच्या विश्वस्त सौ. मयुरी देसाई यांनी सांगितले की, पावसाळ्यात येथे नदीचे पाणी येते. त्या दृष्टीने समाधिस्थळ सुरक्षित करण्यासाठी बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. येथे समाधिस्थळाबरोबरच ध्यानमंदिर, भक्तनिवास अशा विविध सुविधा भक्तांसाठी उभारण्यात येणार आहेत. या अनुषंगे यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची जरुरी आहे. यासाठी भक्तांनी आपापल्या परीने आर्थिक मदतीसाठी न्यासाच्या विश्वस्तांशी संपर्क साधावा, असे आवाहनही सौ. देसाई यांनी यावेळी केले.