कोल्हापूर ता.06 :- राजर्षी छ.शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्यावतीने आज सिध्दार्थ नगर नर्सरी बाग येथील राजर्षी छ.शाहू महाराज समाधी स्थळ, दसरा चौक येथील राजर्षी छ.शाहू महाराज यांच्या पुतळयास प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदराजंली वाहिली.
यावेळी उप-आयुक्त शिल्पा दरेकर, उपशहर अभियंता नारायण भोसले, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, कादर मलबारी, माजी नगरसेवक जय पटकारे, अजित ठाणेकर, छत्रपती शाहू स्मारक व्यवस्थापक कृष्णाजी हरुगडे, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले व कर्मचारी उपस्थित होते.