कोल्हापूर, ता. 29 – येथील कोल्हापूर सराफ व्यापारी संघ व धंद्यात तेजी मंदी ग्रुपच्या वतीने आयोजित जवाहर गांधी व कांतिलाल ओसवाल (केजी) यांच्या मार्गदर्शनाने झालेल्या रक्तदान शिबिरात 75 बॅग रक्त संकलन झाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रक्ताची कमतरता जाणवत आहे. त्यासाठी वैभवलक्ष्मी ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
यामध्ये सराफ, कारागीर, मित्रपरिवार आणि ग्रुपच्या सदस्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांचा पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि बॅग देऊन सत्कार करण्यात आला.
रक्तदान शिबिराचे नियोजन कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, संचालक प्रीतम ओसवाल, संतोष पाटील, सचिन मुसळे, कुमार ओसवाल, हितेश ओसवाल, अमित शहा, अश्विन ओसवाल, जगदीश रांगोळे, नितीन ओसवाल, चंद्रकांत संकपाळ, मुकुंद देवगावकर, संपत पाटील, नितीन पंडितराव, राजेश माळकर, अजित भोसले, गिरीश पेडणेकर, कमलेश ओसवाल, मयूर लुनिया, शीतल पोतदार, उमेश शेळके, विक्रम कुलकर्णी, शुभम माने आदीनी केले.