कोल्हापूर ता.29 : महानगरपालिकेच्या मंजूर धोरणानुसार दिनांक 30 जून 2021 अखेर मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांसाठी चालू आर्थिक वर्षातील मागणीमध्ये 6% सवलत देण्यात आली आहे. या सवलत योजनेचा बुधवार दि.30 जून हा शेवटचा दिवस आहे. महानगरपालिका शहर हद्दीमधील मालमत्ता कराची सन 2021-22 या सालाकरीता देय असणारी घरफाळा बिले महापालिकेच्या संकेत स्थळावर यापुर्वीच प्रसिध्द केली आहेत. दि. 1 जुलै पासून 30 सप्टेंबर पर्यंत नागरीकांना मंजूर धारेणानुसार 4% सवलत दिली जाणार आहे. दिनांक 30 जून 2021 सवलतीचा शेवटचा दिवस असल्याने सर्व नागरी सुविधा केंद्रे सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे.
दिनांक 1 एप्रिल ते 29 जून 2021 अखेर 6% सवलत योजनेमधून महापालिकेच्या तिजोरीत रुपये 15,46,02,496/- रुपये जमा झालेले आहेत. यामध्ये गांधी मैदान नागरी सुविधा केंद्रामध्ये रु.1,65,40,381/-, छत्रपती शिवाजी मार्केट नागरी सुविधा केंद्रामध्ये रु.1,48,14,742/-, राजारामपूरी नागरी सुविधा केंद्रामध्ये रु.2,45,45,292/-, छत्रपती ताराराणी मार्केट नागरी सुविधा केंद्रामध्ये रु.3,27,73,971/-, महापालिका मुख्य इमारत नागरी सुविधा केंद्रामध्ये रु.2,82,22,979/-, कसबा बावडा नागरी सुविधा केंद्रामध्ये रु.25,57,596/- अशा सहा नागरी सुविधा केंद्रामध्ये रु.11,94,54,961/- जमा झाले आहेत. तसेच ऑनलाईन रु.3,51,47,535/- (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) जमा झाले आहेत. नागरी सुविधा केंद्र व ऑनलाईन असे मिळून रु.15,46,02,496/- रुपये जमा झालेले आहेत. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांना घेता यावा यासाठी महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे शनिवार व रविवारी सुट्टी दिवशीही 30 जून अखेर सुरु ठेवण्यात आली आहेत. महानगरपालिका ही कोल्हापूर शहराची प्रतिनिधीत्व करणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. कोविड-19 अंतर्गत कोल्हापूर शहरामध्ये कराव्या लागणाऱ्या उपाययोजना करण्यामध्ये महानगरपालिका पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. सद्या महानगरपालिकेची वसूली कमी असल्याने विविध कामगिरी करण्यावर आर्थिक उपलब्धतेमुळे महापालिकेस अडचणी येत आहेत.तरी शहरातील सर्व मिळकत धारकांनी http://kolhapurcorporation.gov.in:8080/kmcop/Mi/CitizenLogin.aspx या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन अथवा महानगरपालिकेच्या पाचही नागरी सुविधा केंद्रांमध्ये सकाळी 9.00 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत आपल्या कराचा भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. ऑनलाईन भरणा करताना कांही अडचणी असलेस महापालिकेच्या डेटा सेंटर (फोन नंबर 0231-2540988) या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.