कोल्हापूर दि.३० माजी महसूलमंत्री मा.नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना ‘विद्या प्रबोधिनी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. माफक फी, तज्ञ शिक्षक, प्रशस्त इमारत, सुसज्ज ग्रंथालय अशा सर्व व्यवस्थेमुळे विद्या प्रबोधिनी स्पर्धा परिक्षा केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शौक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने अनेक उपक्रम राबवले जात असतात.
कोरोनाच्या जागतीक संकटामुळे गेली दीड वर्षे लोकांचे जीवनमान बदलले आहे, अर्थचक्र विस्कटले आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक लोकांचे रोजगार बंद पडले आहेत, अनेकांना नोकरी वरून कमी करण्यात आले आहे. सर्व सामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. मंदी, बेरोजगारी त्यातच जागतिक महामारीमुळे वैद्यकीय खर्च यामुळे कुटुंबाच्या प्राथमिक गरजा देखील पुरवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा या गंभीर परिस्थितीमध्ये सध्या मनुष्य जगण्याचा संघर्ष करताना दिसत आहे.
औद्योगीक क्षेत्रामध्ये सध्या कुशल मनुष्य बळाची आवश्यकता लक्षात घेऊन आर्थिक मंदीच्या काळात विद्यार्थ्यांना रोजगार निर्मितीसाठी सतत विविध उपक्रम घेणा-या विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्यावतीने मोफत CNC, VMC ऑपरेटिंग प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना काळात रोजगारक्षम प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी युवकांना लाभणार आहे. उद्योग जगतामध्ये नितांत आवश्यक असणारी कौशल्ये या प्रशिक्षण योजने अंतर्गत तज्ञ व अनुभवी मार्गदर्शकांच्या माध्यमातून शिकवणेत येणार आहेत. विद्या प्रबोधिनी आयोजित CNC, VMC ऑपरेटिंग प्रशिक्षणामध्ये औद्योगीक सुरक्षा, ड्रॉइंगचे वाचन (प्राथमिक), मेजरिंग इन्स्ट्रृमेंटचा वापर, जॉब चेकिंग, CNC ऑपरेटिंग, VMC ऑपरेटिंग, प्रत्यक्ष मशीनवर कामाचा अनुभव इत्यादी गोष्टींचा समावेश असणार आहे.
यासाठी शैक्षणिक आहार्तेची कोणती अट नसून वयोमर्यादा १८ ते ३५ असणार आहे. तसेच प्रशिक्षण कालावधी ३ आठवड्यांचा असेल यामध्ये दररोज २ तास प्रशिक्षण घेण्यात येईल. प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सदर प्रशिक्षणासाठी नोंदणी विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांचे संपर्क कार्यालय, जरग नगर कमानी जवळ २७ जून ते ६ जुलै २०२१ पर्यंत सकाळी १० ते दुपारी १.३० व दुपारी ३ ते ६ या वेळेमध्ये सुरु आहे.
तरी सध्याच्या बेरोजगारीच्या परिस्थितीमध्ये रोजगार उपलब्धतेसाठी, कौशल्य प्राप्तीसाठी जास्तीत जास्त युवकांनी या प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी असे आवाहन विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केले आहे. ज्या व्यवसायिकांना आणि उद्योजकांना मनुष्यबळाची गरज आहे अशांनी देखील संपर्क साधावा त्यांना कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.