कोल्हापूर दि. 2 : कोरोनामुळे ओढवलेल्या जागतिक महामारीच्या संकटाशी आज प्रत्येकजण लढत आहे. आरोग्य विषयी काळजी घेत आर्थिक घडी रुळावर आणण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहे. महामारीला बाजूला करून अनेक योद्धे मदत कार्यात उतरले आहेत. मात्र या सर्व घटकांशी लढत आपल्या जीवनाचे काही दिवस आनंदात जगू पाहणाऱ्या पांचगांव आर के नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील अनाथां पासून ते वयोवृद्ध आजी – आजोबांना आपल्या मदतीची अपेक्षा लागून राहिली आहे. सन १९९५ साली कै रुक्मिणी पांडुरंग पाटोळे व मा शिवाजी पांडुरंग पाटोळे कुटुंबीयांनी सुरु केलेल्या मातोश्री वृद्धाश्रमात गेली २५ वर्ष अविरत सेवा सुरु आहे. कोणत्याही शासकीय मदती विना मा शिवाजी पाटोळे व घरातील 12 जण कुटूंबातील हि सेवा गेली 25 वर्षे सेवा बजावत आहेत. सध्या मातोश्री वृद्धाश्रमात 50 नागरिक आहेत. सध्या कोरोना महामारीमुळे दानशूर दात्यांची संख्या कमी झाली असून वृद्धाश्रम अडचणीत सापडला आहे. वृद्धाश्रमास देणगी म्हणून आर्थिक, वस्तू धान्य, बांधकाम , भाजीपाला व अन्य स्वरूपात देखील आपण मदत करू शकता. मातोश्री वृद्धाश्रमात श्रमदान करू इच्छिणाऱ्यानाही संधी देण्यात येणार आहे. तसेच मातोश्री वृद्धाश्रमात आपण आपला वाढदिवस व स्मरणार्थ असे कार्यक्रम साजरा करून अन्नदानासारख्या उपक्रमात सहभागी होऊ शकता. मागील वर्षी कोरोनाच्या संकटात मातोश्री वृद्धाश्रम कसाबसा सावरला मात्र आता परत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे या वृद्धाश्रमास आपणाकडून मदतीची अपेक्षा आहे. आपणही मदत करू इच्छित असाल तर अँड शरद पाटोळे यांना व्हाट्सअप नंबर वर ९९२३६२४७४८ मेसेज करू शकता तसेच 9577357777 या दोन्ही क्रमांकावर संपर्क साधू शकता. असे आवाहन मातोश्री वृद्धाश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे