कोल्हापूर :ता.०३ : आज गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालया मध्ये संघाच्या संचालक मंडळाची दूध विक्री दरासंदर्भात बैठक पार पडली. दोन दिवसांपूर्वी अमुल दूध संघाने राज्यात दूध विक्री दरामध्ये दोन रुपयांची वाढ केली आहे. याच पार्श्वभूमीवर हि बैठक आयोजीत करण्यात आली होती.
गोकुळची दूध विक्री ही इतर सहकारी दूध संघाच्या तुलनेत अधिक आहे त्यामुळे अमुल ने दूध विक्री वाढीच्या घेतलेल्या निर्णयामुळे गोकुळ काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले होते. पण आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये वारणा, चितळे, राजाराम बापू व इतर सहकारी दूध संघाशी दूध विक्री दर वाढी बाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचे सर्वांचे एकमत झाले व इतर संघाशी चर्चा करण्याचा संपूर्ण अधिकार चेअरमन विश्वास पाटील यांना देण्यात आले.
यावेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले कि कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शिल्लक दूधाचा प्रश्न, पेट्रोल डिझेलच्या दरवाढ यामुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ यासर्व बाबीचा विचार करून दूध विक्री दरात वाढ करावी का ? याबाबत संचालक मंडळाचा बैठकीत चर्चा झाली.
यावेळी गोकुळचे चेअरमन श्री. विश्वास पाटील (आबाजी) माजी चेअरमन व जेष्ठ संचालक श्री.अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील- चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेगे, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील (एस.आर.), प्रकाश पाटील,अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो उर्फ वसंत खाडे, चेतन नरके, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डि. व्ही. घाणेकर व संघाचे इतर अधिकरी उपस्थित होते.