कोल्हापूर, दि. १८ : कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज कोविशिल्डचे सुमारे ४५ हजार डोस उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. प्राप्त झालेल्या डोसमध्ये आजरा – १ हजार ७१०, भुदरगड – १ हजार ८९० , चंदगड – २ हजार ५६० , गडहिंग्लज – ३ हजार २८०, गगनबावडा – ५००, हातकणंगले – ९ हजार २००, कागल – २ हजार ५८०, करवीर – ४ हजार ५६० , पन्हाळा – २ हजार ६४०, राधानगरी – २ हजार ६६०, शाहूवाडी – २ हजार ९२० तर शिरोळ तालुक्यासाठी ४ हजार १६० डोस प्राप्त झाले आहेत. सीपीआर रूग्णालयासाठी ३४०, सेवा रूग्णालय, (कसबा बावडा ) ५०० तर कोल्हापूर महानगरपालिका ५ हजार ५०० असे एकूण ४५ हजार डोस प्राप्त झाले आहेत.
४५ वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस प्राधान्याने देण्यासाठी तालुकानिहाय आवश्यकतेनुसार लसीचा कोटा ठरविण्यात आला आहे. संबंधितांनी लस घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे .