कोल्हापूर…… रवींद्र कुलकर्णी यांच्याकडून……
केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजना ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य सेवा म्हणजेच एन आर एच एम विभाग सुरू केला या विभागाच्या वतीने माता-बाल संगोपनाच्या सर्व योजना ग्रामीण भागात यशस्वी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांच्या वर टाकण्यात आली राज्यात आजअखेर 65000 आशा महिला कार्यरत आहेत यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आशा महिलांची संख्या लक्षणीय आहे त्यांचं नेतृत्व सौ नेत्र दीपा पाटील ज्योती तावरे उज्वला पाटील या करत आहेत दरमहा केवळ दीड हजार मानधनावर या आशा महिला काम करतात म्हणजेच रोज फक्त 33 रुपये हजेरी त्यांना पडते याच्या बदल्यात त्यांच्याकडून पासष्ट काम करून घेतली जातात या महिलांना कोणता अधिकारी काम न सांगेल तो आळशी अशी आहे या महिलांना कोणत्याही शासकीय सेवा सुविधा आणि संरक्षण नाही गेल्या दीड वर्षात खऱ्या अर्थाने या महिला कोरोणा युद्धा म्हणून काम करत आहेत हे काम करत असताना त्यांना अनेक ठिकाणी अपमान आणि मारहाण झाली तरी त्यांनी आपलं काम सुरु ठेवले करोना विमा संरक्षण शासकीय कर्मचाऱ्यांना मिळत आहे पण या महिलांच्या वर मात्र कोणतेही विमा संरक्षण नाही कोल्हापुरातील फिरंगाई आरोग्य केंद्रावर कार्यरत असणाऱ्या सौ रेशमा सचिन दिवटे यांना गेल्या सोमवारी अपघात झाला त्यांची दुचाकी स्लिप होऊन त्या डोक्यावर जोरात आपटल्या शुक्रवार पर्यंत त्या बेशुद्धावस्थेत होत्या त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता रस्त्यावर डोकं जोरात आपटल्याने त्यांच्या नाक कान तोंड मधून सुद्धा रक्ताचे फवारे उडाले होते पंधरा मिनिटे त्या जखमी अवस्थेत रस्त्यावर तळमळत होत्या तडफडत होत्या पण त्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही त्यानंतर त्यांना राजारामपुरीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पाच दिवसाच त्यांचे बिल एक लाखापर्यंत झालं त्यांच्या कुटुंबीयांनी तीस हजार भरले राजा उदार झाला आणि भोपळा हाती दिला या न्यायानं रुग्णालयाने त्यांना केवळ दोन हजार रुपये बिलामध्ये सवलत दिली अनेक खटपटी विनंती केल्यानंतर कोल्हापूर महापालिकेनं आणखी तीस हजार रुपये ची जबाबदारी जिवाच्या करारावर उचलली पण कोणत्याही प्रयत्नाचा उपयोग नव्हता सौ रेश्मा दिवटे यांचं दोन दिवसापूर्वी निधन झालं त्यांचा मेंदू आणी हृदय केवळ दहा टक्के कार्यरत होत या अवस्थेत त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय सुद्धा घेतला होता महावीर कॉलेज परिसरातील एका खाजगी रुग्णालयात या संबंधित चर्चा झाली होती पण वैद्यकीय कारणांमुळे अवयव दानाचा निर्णय रद्द झाला सौ रेश्मा दिवटे यांच्या अकाली निधनामुळे त्या काम करत असलेल्या क्षेत्रातील अस्थिरता आणि असुरक्षितता यानिमित्ताने अधोरेखित झाली