कोल्हापूर : ता.२० आषाढी एकादशी निमित्त ताराबाई पार्क येथे कर्मचाऱ्यांना खिचडी व केळी वाटप करण्यात आले. दरवर्षी प्रति पंढरपूर असलेल्या नंदवाळ ता. करवीर येथे आषाढी वारी दिवशी वाटप केले जात होते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी संघाच्या ता. पार्क कार्यालयातच कर्मचाऱ्यांना खिचडी व केळी वाटप संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चेअरमन मा.श्री. विश्वास पाटील, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ. यु. व्ही. मोगले, व्यवस्थापक संकलन एस. व्ही. तुरंबेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, डॉ. कामत,आण्णा पाटील, अशोक पाटील, विनोद पाटील,निवास पाटील, प्रकाश आसुर्लेकर, सागर शेलार, राऊसाहेब घाटगे, अदिनाथ जाधव, राहूल पाटील व इतर कर्मचारी आदि उपस्थित होते.