कोल्हापूर/प्रतिनिधी : भाषा ही ऐकूनच शिकता येते व बोलण्यास मदत होते . कर्णबधीरतेमुळे ऐकू येत नाही . त्यामुळे भाषा विकास होत नाही . या दोषावर आधुनिक उपचार पद्धती म्हणजे कॉक्लीअर इम्प्लांट ( cochlear implant ) शस्त्रक्रिया गरजेचीच असते.ही कॉक्लीअर इम्प्लांट ही कानाची अत्याधुनिक शस्त्रक्रिया आहे. या अगोदर मुंबई- पुण्यात होणारी ही शस्त्रक्रिया आता लाँकडाऊन मुळे कोल्हापूरात करण्यात संवाद ने सर्वौच्या समन्वयाने यश मिळवले आहे, सध्या या मध्ये पाच बालकावर युध्द पातळीवर शस्त्रक्रिया होण्यासाठी लागत असलेल्या ३० टक्के रक्कम पुर्तीसाठी समाजातील दानशुरासह औद्योगिक विश्वाने मदत करावी , असे आहवान समन्वयक संवाद आणि आत्मा या दोन्ही संस्थाच्या वतीने करण्यात येत आहे. या शस्त्रक्रियेमध्ये कानाच्या आतमध्ये यंत्र बसवले जाते . हे यंत्र कानाबाहेरील श्रवणयंत्रासारख्या दिसणाऱ्या यंत्राला जोडले जाते . यामुळे मुलास उत्तमरीत्या ऐकू येते . कॉक्लीअर इम्प्लांट मुळे बाळाला ऐकण्यास मदत होते . स्पीच थेरपीच्या सहाय्याने बाळ बोलू लागते ,आणि सामान्य माणसासारखे समाजात संवाद करू शकते . शिक्षणास अडथळा येत नाही .
संवाद क्लिनीक गेली ३० वर्षे कर्णबधीरता या क्षेत्रात कार्यरत आहे . यामध्ये जन्मजात बालकापासून मोठ्या माणसांपर्यंत ” ऐकणे व बोलणे ” या संबंधी सर्व मार्गदर्शन अत्याधुनिक सुविधा- टेक्नॉलॉजी उपचार उपलब्ध आहेत . संवाद क्लिनिक गेली १५ वर्षे कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियेपश्चात स्पीच थेरपी याबाबत काम करत आहे . ही शस्त्रक्रिया आधी मुंबई व पुणे या मोठ्या शहरामध्येच होत होती . पण आता संवाद क्लिनिकच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया कोल्हापूर येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये केल्या जाणार आहेत . त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान आता कोल्हापूरमध्ये उपलब्ध होईल . गेल्यावर्षी ५ मुलांचे निदान होऊन ती शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत . ही शस्त्रक्रिया खर्चिक असून एका मुलाच्या पूर्ण उपचाराचा खर्च आठ लाख इतका आहे . यातील ८० टक्के रक्कम शासकीय योजनासह इतर संस्थाच्या मदतीने उपलब्ध झाली असून या मुलांच्या पालकांना अजून २ लाख रु.मदतीची आवश्यकता आहे . आस्था चॅरीटेबल इन्स्टिट्यूट व संवाद रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही रक्कम उभी करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती – सामाजिक संस्थानी तसेच औद्योगिक संस्थानी आपल्या सामाजिक कृतज्ञता निधीतून ( सी.आर.एफ्. ) मदत करावी , असे जाहीर आहवान करण्यात येत आहे.सदर मदतीसाठी ८० – जी आणि ची ही सुविधा देगणीदाराना मिळणार आहे , तरी ईच्छुकानी आस्था चँरिटेबल ईन्टीट्युट , बँक खाते नंबर आयएफसी कोड येथे रक्कम जमा करावी अथवा संवाद वाचा श्रवणदोष ऊपचार केंद्र , भेंडे गल्ली, शिवाजी पुतळ्या जवळ , कोल्हापूर येथे संपर्क साधावा अथवा ०२३१-२५४१०७१ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.