कोल्हापूर/प्रतिनिधी : सलग १८ वर्षे सुरु असलेली श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ व जय शिवराय फुटबॉल प्लेयर तरुण मंडळ यांचे वतीने सुरु असलेली श्री क्षेत्र कोल्हापूर ते प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ येथे आषाढी वारी मंगळवारी २०जुलै रोजी विठ्ठल मंदिर मिरजकर तिकटी येथून सकाळी साठेआठ वाजता प्रस्थान झाली. यावेळी विठ्ठल मंदिरात ज्येष्ठ कार्यकर्ते वंसतराव देशमुख, महालक्ष्मी कँलेन्डरचे रणवीर शिर्कै, रुतुराज क्षीरसागर यांचे हस्ते आरती झाली.तसेच जुना राजवाडा पोलिस स्थानकाचे प्रमोद जाधव,विश्व हिंदू परिषदेचे अँड.रणजितसिंह घाटगे यांच्या हस्ते माऊली अश्व पूजन संपन्न झाले.
सलग दुसरे वर्षी आसलेल्या कोरोनाच्या जागतिक संकटामुळे , जिल्हयातील पंचक्रोशीतील ११० हून अधिक गावातील हजारो वारकरी यांचा सहभाग असलेली ही दिंडी कोरोनाचे सर्व नियम पाळून फक्त सजवलेल्या केएमटी मधून रवाना झाली. या वेळी पाहुण्याना दींडी प्रमुख हभप आनंदराव लाड महाराज व बाळासाहेब पवार, अँड.राजेंद्र किंकर ,वासुदेव संभाजी पाटील यांचे हस्ते श्रीफळ आणि तुळस हार देण्यात आले. कोरोना मुळे पूर्वसंध्येला होणारी नगर प्रदक्षिणा आणि सासने इस्टेट हॉल येथील रात्रीचे प्रवचन व किर्तन हे दोन्ही सोहळे शासकीय मार्गदर्शनानुसार रदद् करण्यात आले होते.
वाटेवर बिनखांबी गणेश मंदिर – ऊमारुती चौक आणि खंडोबा देवालय येथे भाविकानी पालखी असलेल्या केएमटी वर फुलासह भंडारा ऊधळण केली.ऊभा मारुती चौकात सायबा समुहाने वारकरी बंधूना चहा व फराळ देण्यात आला. या ऊत्सवासाठी संस्थापक संचालक दिपक गौड, संतोष कुलकर्णी , राजेंद्र मकोटे, संभाजी पाटील, गंगाधर दास , हभप एम.पी.पाटील , संतोष रांगोळे असे आवाहन श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ व जयशिवराय फुटबॉल प्लेयर तरुण मंडळ, राध्येय ग्रुप च्या कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले .