गांधीनगर:प्रतिनिधी-पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मुख्य हायवेवरून एकमेकांच्या ओढीने जाणाऱ्या पान कावळ्या मादीच्या ८ पिलांना महामार्ग रोड सेफ्टी व जयहिंद रोड बिल्डर्स,महामार्ग मृत्युंजय दूतच्या कर्मचाऱ्यांनी राजाराम तलाव मध्ये सोडून जीवनदान दिले आहे.
मंगळवार सकाळी १० वाजता महामार्ग पेट्रोलिंग कर्मचारी गस्त घालत असताना मुख्य हायवे वरून पान कावळ्या मादीची ८ पिल्ले एकमेकाला बिलगून महामार्गावरून जात होती.अश्या वेळी पिल्लांना वाहनांची धडक होऊ नये म्हणून त्यांनी सुसाट वाहनांना थांबवले आणि त्या पिल्लांना मुख्य मार्गावरून बाजूला घेतले व एका बकेट मध्ये ठेवली. पिल्लाची सुरक्षा महत्वाची असल्याने राजाराम तलाव येथे सोडण्याचे निश्चित झाले.यावेळी जयहिंद रोड बिल्डर्सचे इजि. विक्रम साळोखे,पेट्रोलिंग इंनचार्ज प्रवीण भालेराव ,महामार्ग मृत्युंजय दूत मोहन सातपुते,शंकर चोगुले यांनी पिल्लांना घेऊन राजाराम तलाव मध्ये सोडण्यात आले.
चौकट:आषाढी एकादशी दिवशी या ८ पिल्लांना जीवनदान देणे आवश्यक होते. जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्याशी चर्चा करून या पिल्लांना सुखरूप राजाराम तलावाच्या पाण्यात सोडले.यावेळी पिल्लांचा चिवचिवाट ऐकून मन कासावीस झाले.