कोल्हापूर/प्रतिनिधी : आज आषाढी एकादशी दिनी शिंगणापुर रोड येथील मातोश्री वृध्दाश्रमात अखंड विणानाद सप्ताहाची सांगता करण्यात आली.आश्रमातील वयोवृद्ध पुरुष आणि महिलां नी यात सहभाग घेतला.आज एकादशी निमीत्य आश्रमातील आजी आजोबांनी एकत्र येवुन दिंडीचा सोहळा साजरा केला.
आश्रमातील सुलोचना पै यानीआपल्या पाई दिंडीतील 40 वर्षाचा अनुभव कथन करताना आश्रमातील आजी आजोबाना जणू पंढरपुर अवतरल्याचा भास झाला सकाळी भल्या पहाटेपासुनच परिसरात साफसफाई
सडा रांगोळी घालुन तुळशी व्रुन्दावन सजवण्यात आले होते अंगणात सर्वानी विठ्ठल नामाचा गजर करत परिसरात दिंडी काढली यात आजींनी तुळशीव्रुन्दावन डोक्यावर घेतले होते.100 मीटर अंतरावरील श्री स्वामी समर्थ मंदिरात विठ्ठलाच्या आरतीने व प्रसाद वाटपानंतर दिंडीसोहळ्याची सांगता झाली मातोश्री व्रुध्हास्रमाच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती वैशालीत राजशेखर उपाध्यक्षा श्रीमती सुर्यप्रकाश चिटणीस पुजा पाटील सह आश्रमातील सर्व महिला पुरुष कर्मचार्यांनी भाग घेतला. या वेळी शासनाने घातलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमाचे काटेकोर पालन करण्यात आले होते.