कोल्हापूर, ता. ३१ – गुढीपाडव्यानिमित्त सराफ बाजार सुरू राहणार असल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी दिली.
ते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्षे विविध कारणाने बाजार बंद राहिला, त्यामुळे सराफ व्यावसायिकांचे तर नुकसान झालेच शिवाय ग्राहकालाही आपल्या पसंतीनुसार दागिने खरेदी करण्यावर निर्बंध येऊन बारसे, मुंज, लग्न असे प्रासंगिक सणवार पुढे-मागे करावे लागले.
नुकतेच राज्य शासनानेही पाडव्यापासून सर्व निर्बंध हटविले आहेत. त्यानुसार येत्या शनिवारी (ता. २) सराफ बाजार सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.