गोकुळ शिरगाव मध्ये स्त्री शक्ती महिला मंडळचा जागर
गांधीनगर:प्रतिनिधी-देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा वाटा वाढला असला तरीही महिलांना समान हक्क, समान प्रतिनिधित्व, सामाजिक सुरक्षा मिळताना दिसत नाही. त्यामुळं २१ व्या शतकातील भारत महिलांच्या प्रगतीशिवाय महासत्ता होऊ शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हक्कांना घटनात्मकरित्या तरतूद करून कायदेशीर संरक्षण मिळवून दिले. डॉ. बाबासाहेब यांच्या या कृतीमागे त्यांचा स्त्रियांच्या हक्काप्रती असलेला विचार आजही समाजासाठी दिशादर्शक आहे.असे प्रतिपादन प्रा.बी. जी. मांगले यांनी केले.गोकुळ शिरगाव (ता.करवीर) येथील स्त्री शक्ती महिला मंडळ आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सौ.विद्या कुरणे होत्या.महाराष्ट्र राज्यात पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत मागासवर्गीय महिला प्रवर्गामध्ये प्रथम आलेल्या गडमूडशिंगीच्या कु. दीपाली कांबळे,
व राहुल कांबळे (पोलीस हवालदार),मोहन सातपुते (युवा संस्था),राजेंद्र माने(उद्योगपती),रघुनाथ कांबळे,अरविंद कांबळे,राम कांबळे,अभिषेक कुरणे,साताप्पा कांबळे,संदीप पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन सौ.प्रियाताई शिरगावकर (अध्यक्षा, महिला सन्मान परिषद)यांनी केले.
कार्यक्रमास सौ.विद्या कुरणे (अध्यक्षा), सौ.सुनीता कांबळे (उपाध्यक्ष) सौ.प्राजक्ता कांबळे (महासचिव), सौ.अंजना कांबळे(खजानिस), श्रीमती शोभा कुरणे, सौ.मनीषा कुरणे, उज्वला कांबळे, सौ.अंजना चौगुले, सौ.सुप्रिया कांबळे,सौ.आकांक्षा आमन्ना, सौ.बाळाबाई कांबळे, सौ.शालिनी कांबळे,सौ.जुगल कुरणे,श्रीमती शारदा कराडे, सौ.हिराबाई कांबळे,माजी अध्यक्ष रमाबाई महिला मंडळ,श्रीमती हौसाबाई कांबळे माजी उपाध्यक्ष रमाई महिला मंडळ ,सर्व ग्रामस्थ,महिला,उपस्थिती त होत्या.या कार्यक्रमात भीम गीतांचा कार्यक्रम महाराष्ट्रचा सुप्रसिद्ध गायक व प्रबोधनकार मोहन धनवडे चित्त रंजन गायन पार्टी मुबई याचा कार्यक्रम पार पडला.