कोल्हापूर ता.19 : महापालिकेच्यावतीने अग्निशमन दलाकडून अग्निशमन सप्ताहानिमित्त देशभूषण हायस्कूल व सम्राटनगर येथे शोध व बचाव कार्याबाबत प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. सदर प्रात्याक्षिकामध्ये अग्निशमन विभागाकडील आत्यधुनिक साधन सामुग्रींचे प्रत्याक्षिक दाखवण्यात आली. याठिकाणी आग लागल्यानंतर प्राथमिक फायर एक्सटिंग्यूशर वापराबाबतची माहिती विद्यार्थ्यांना व नागरीकांना देण्यात आली. तसेच आग लागल्यावर किंवा आगिच्या ठिकाणी एखादा व्यक्ति आडकल्यास अग्निशनम विभाग त्याला शिडी व दोरच्या सहाय्याने वाचवण्याचे प्रात्याक्षिके यावेळी दाखविण्यात आले आहे.
दिनांक 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई गोदीत एसएसफोर्ट स्टिकिंन या जहाजाचा स्फोट होऊन लागलेल्या भिषण आगीशी झुंज देताना अग्निशमन दलाच्या 66 जवानांना हौत्याम्य प्राप्त झाले. त्यानंतर अग्निशमन दलाचे कार्य करताना प्राणाची आहुती देणाऱ्या अग्निशमन सेवेतील अधिकारी/ कर्मचारी यांच्या स्मृतीप्रित्यार्थ तसेच जनजागृती निर्माण होण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुचनेनुसार संपूर्ण देशात 14 ते 20 एप्रिल 2022 अग्निशमन सप्ताह पाळण्यात येतो. त्यामध्ये “शिका अग्निसुरक्षीतता, वाढवा उत्पादकता” हे घोषवाक्य प्रसिध्दीस देण्यात आले आहे.
आजच्या प्रात्यक्षिकामध्ये अग्निशमन विभागकडील कटर, स्प्रेडर, स्लॉप कटर, बी.ए.सेट, हायड्रोलिक जॉक, हायड्रालिक कटर, कॉम्प्रेसर, लिफ्टींग बॅग इत्यादी साहित्याचे प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. या प्रात्याक्षिकावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी रणजीत चिले, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, स्थानक अधिकारी मनीष रणभीसे, कांता बांदेकर, दस्तगीर मुल्ला तसेच अग्निशमन विभागाकडील जवान उपस्थीत होते.