कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या श्रीमती जयश्री जाधव यांनी जिंकली यानिमित्त आज मुंबईत राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष मा. शरद पवार साहेब यांची जयश्री जाधव यांनी भेट घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी, पवार यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीतील विजयाबद्दल श्रीमती जयश्री जाधव यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी, ग्रामविकास मंत्री मा. हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री मा. सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष मा. राजेश क्षीरसागर, श्रीमंत छत्रपती मालोजीराजे आदी उपस्थित होते.
यानंतर श्रीमती जाधव यांनी मुंबई, मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी, दादांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीतील विजयाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी ग्रामविकास मंत्री मा. हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. उदय सामंत, मदत व पुनर्वसन मंत्री मा. विजय वडेट्टीवार, अन्न व नागरी व पुरवठा मंत्री मा. छगन भुजबळ, पाणीपुरवठा व स्वछता मंत्री मा. गुलाबराव पाटील, गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री मा. सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष मा. राजेश क्षीरसागर, श्रीमंत छत्रपती मालोजीराजे आदी उपस्थित होते.