उदगीर प्रतिनिधी, सैदांतिक भाग विज्ञानाने जेवढे समृद्ध तेवढेच शास्त्र प्रगत व्हायला सोपे जाते. आयुर्वेदाची कालानुरूप ओळख करून देणे व मूळ सिद्धांतांना परत एकदा स्पष्ट करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आयुर्वेदावर प्रकाश टाकणारी साहित्यकृती म्हणजे प्राचीन भारतीय सामान्य विज्ञान एक नव कटाक्ष होय असे मत डॉ.शिवाजी नेळगे यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात आयोजित व प्रसिद्ध आयुर्वेदतज्ञ डॉ.सुरेश गरड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 268 व्या आणि डॉक्टर्स डे विशेष वाचक संवाद मध्ये आयुर्वेदाचे अभ्यासू सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी ईश्वरराव नेळगे, वर्धा यांनी स्वलिखित प्राचीन भारतीय सामान्य विज्ञान एक नव कटाक्ष, या साहित्यकृतीवर संवाद साधताना पुढे म्हणाले की इतिहासाचा वेध, नाडीतंत्र, रासायनिक समन्वय आणि एकीकरण, श्वसन आणि हवेची अदलाबदल, शरीर द्रव आणि रक्ताभिसरण, जीव मूलद्रव्ये, पचन आणि पोषण इत्यादी बद्दल अभ्यासपूर्वक लेखन करण्याचा प्रयत्न केला आहे असे ते म्हणाले.
शेवटी अध्यक्षीय समारोपात डॉ.सुरेश गरड म्हणाले की अत्यंत
महत्त्वपूर्ण माहितीचे संकलन करून आयुर्वेदातील शब्द त्यांचे अर्थ व व्याख्या यांची उकल या पुस्तकात केली आहे. कार्यक्रमाचे संचलन विरभद्र स्वामी यांनी तर आभार भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे सेवानिवृत्त अधिकारी मुरलीधर जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी संयोजक अनंत कदम, प्रा.राजपाल पाटील, हनुमंत म्हेत्रे, राजेंद्र एकबेकर, पत्रकार दयानंद बिरादार , स्वामी योगेश, आनंद बिरादार आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्ता पाटील, मेघा क्लिनिकचे डॉ. धनाजीराव कुमठेकर , साई क्लिनिकचे डॉ. चंद्रकांत कोठारे ,ग्रंथ मित्र दीपक बलसुरकर, बालाजी सुवर्णकार, अंतेश्वर चालवा, किशन दत्तात्रय उगले, कलावती भातांबरे, नीता कांबळे, लता नेळगे, वट्टमवार सुमित्रा, प्रतिभा बिरादार आदींसह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थितीत होते.