नवी दिल्ली : २०१८ मध्ये सुरू झालेल्या इंडिया २. ० या उपक्रमामुळे स्कोडा ऑटो इंडियाने आपलेच विक्रम मोडत दर महिन्यात नव्या विक्रमांच्या दिशेने वाटचाल करत आहे. जून २०२२ मध्ये ६,०२३ स्कोडा गाड्यांनी त्यांच्या नव्या घरांमध्ये प्रवेश केला. मार्च २०२२ मध्ये ५, ६ ०८ गाड्यांच्या विक्रीने त्याआधीचा दशकभराचा विक्रम मोडीत काढला होता आणि त्यानंतर हा पुन्हा एक नवा विक्रम रचला गेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत जून २०२१ च्या ७३४ गाड्यांच्या विक्रीच्या तुलनेत जून २०२२ मध्ये ७२१टक्के वाढ झाली. इतकेच नाही, स्कोडा ऑटो इंडियाने २०२१ मधील २३८५८ गाड्यांच्या वार्षिक विक्रीचा टप्पा पार करत २०२२ च्या पहिल्या सहामाहीतच २८,८९९ इतक्या गाड्या विकल्या आहेत.
स्कोडा ऑटो इंडिया २०२२ साठी असलेले अंदाज आणि लक्ष्य पार करत आहे. मागील महिन्यात कंपनीने डिसेंबर २०२१ मधील १३५ टचपॉईंट्सवरून २०५ हून अधिक टचपॉईंट्स अशी प्रगती केली आहे. या उत्पादक कंपनीतील एक सर्वात जुने नाव आणि भारतातील एक सर्वाधिक चालवली जाणारी, सतत उत्पादन घेतले जाणारी कार म्हणजे स्कोडा ऑक्टिव्हिया. या गाडीने नुकताच एक लाखांचा टप्पा गाठला. ऑक्टिव्हिया आणि सुपर्बसारख्या गाड्या त्यांच्या विभागात आघाडीवर आहेत. कोडिअॅकची या वर्षातील विक्री पूर्ण झाली आहे आणि इंडिया २. ० मध्ये स्टार असलेल्या स्लाविया आणि कुशाक या गाड्यांनीही उत्तम आकडेवारी गाठली आहे. भारतात दोन दशकांचा संपन्न वारसा असलेली ही झेक उत्पादक कंपनी सातत्याने विविध पातळ्यांवर दमदार प्रगती करत आहे.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर झॅक होलिस म्हणाले की इंडिया २. ० मधील आमची दोन्ही उत्पादने अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत बाजारपेठेत सादर झाली होती. जागतिक महामारी, सतत होणारे लॉकडाऊन, आर्थिक उलथापालथ, भौगोलिक अस्थिरता आणि आता सातत्याने सेमीकंडक्टरचा तुटवडा भासत असल्याने संपूर्ण पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे. त्यामुळे जुने विक्रम मोडीत काढत नवे विक्रम नोंदवणं म्हणजे स्कोडा ऑटो इंडियामध्ये आम्हा सर्वांसाठी अतुलनीय असं यश आहे. आमच्या सर्व टीम्सनी सातत्याने केलेल्या मेहनतीचं हे फळ आहे. आमच्या टीम्सनी फक्त उत्पादनाच्या बाबतीत नाही तर ग्राहक समाधान, आमच्या नव्या कस्टमर टचपॉईंट्सचे व्यापक, सखोल अस्तित्व निर्माण करणे आणि ग्राहककेंद्री सेवा उपक्रम राबवणे अशा सर्व स्तरांवर काम केले. आमच्या डीलर भागीदारांचाही यात मोठा वाटा आहे. त्यांनी फार चांगली कामगिरी केली आहे. भारतात २०२२ हे ‘सर्वात मोठे’ वर्षं असेल याची खातरजमा करण्यासाठी आम्ही सारे एकत्रित प्रयत्न करू.”