कोल्हापूर ८ जुलै २०२२ : बजाज कन्झ्युमर केअर लिमिटेड तर्फे आपल्या स्किनकेअर सेग्मेंटमध्ये बजाज आल्मंड ड्रॉप्स मॉईश्चराईझिंग साबणाची घोषणा करण्यात आली आहे. बदामाचे तेल आणि व्हीटामिन ईयुक्त हा साबण त्वचेला उत्तम मॉईश्चराईझेशन देतो आणि त्वचा नरम, मुलायम आणि तजेलदार बनवतो. वैज्ञानिक संशोधन आणि इनोव्हेशन मधून बजाज आल्मंड ड्रॉप्स मॉईश्चराईझिंग साबण त्वचेला अतिरिक्त मॉईश्चराईझेशन देतो. आल्हादक सुगंध, धुवून काढण्यातील सुलभता आणि स्पर्धात्मक किंमत अशी वैशिष्ट्ये असलेला हा साबण ग्राहकांसाठी किंमतीच्या दृष्टीने उत्कृष्ट परिणाम देतो. ग्रेड १ गुणवत्तेच्या या साबणाचे टीएफएम मूल्य ७६ टक्के असून सौंदर्यदृष्टीने बनवलेला या साबणाचा आकार देखील खूप आकर्षक आहे
सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या स्किन केअरच्या गरजा ध्यानात ठेवून हे उत्पादन विकसित करण्यात आले आहे आणि त्याच्या किंमतीमुळे ते सर्व प्रकारच्या उपभोक्ता सेग्मेंटमधील लोकांसाठी प्राप्य असेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेले प्रीमियम मॉईश्चराईझिंग साबण फारच महाग आहेत, ज्यामुळे अपग्रेड होऊ पाहणार्या ग्राहकांना ते आकर्षित करू शकत नाहीत. हीच दरी बजाज आल्मंड ड्रॉप्स मॉईश्चराईझिंग साबणाने, त्याच्या आकर्षक किंमतीमुळे भरून काढली आहे.या उत्पादनाला कंपनीच्या बजाज आल्मंड ड्रॉप्स हेअर ऑइल उत्पादनाचा लाभ मिळाला आहे, या तेलाने अनेक दशकांपासून १३,५०० कोटी रु. च्या हेअर ऑइल क्षेत्रात बळकट स्थान आणि उत्कृष्ट ब्रँड इक्विटी मिळवली आहे.
बजाज कन्झ्युमर केअरचे व्यवस्थापकीय संचालक श्री. जयदीप नंदी म्हणाले की हा मॉईश्चराईझिंग साबण बाजारात आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे, ज्याची ग्राहकांना आमच्याकडून बर्याच काळापासून अपेक्षा होती. अनेक पिढ्यांपासून बजाज आमंड ड्रॉप्स हे भारतीयांचे एक लाडके उत्पादन आहे, कारण त्यात बदामाचे तेल आणि व्हीटामिन ई यांचे मिश्रण आहे, जे केवळ केसच नाही, तर त्वचेसाठी देखील लाभदायक असल्याचे मानले जाते. बजाज आमंड ड्रॉप्स मॉईश्चराईझिंग साबणाच्या माध्यमातून तेच गुण आता आम्ही एका प्रीमियम साबणाच्या रूपात सादर करत आहोत. बजाज आल्मंड ड्रॉप्स ब्रॅन्डिंग आलेला हा साबण ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरेल आणि आमच्या हेअर ऑइलला मिळाला तसाच प्रतिसाद या उत्पादनाला देखील मिळेल.