कोल्हापूर ता.08 : महापालिकेच्यावीने शुक्रवारी शहरात सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर करणा-या सहा व्यापा-यांकडून 30 हजार दंड वसूल करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्लॅस्टिक व थर्माकॉल इत्यादीपासून तयार केलेले वस्तूंचा वापर, वितरण, साठवणूक, घाऊक, किरकोळ विक्री तसेच उत्पादन करणारे नागरिक व व्यावसायीक यांच्यावर महापालिकेच्या भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे. सदरची कारवाई शाहूपूरी परिसरातील मनीष ट्रेडर्स, सदगुरु ट्रेडर्स, सुनील शिंदे, सोहम हॉटेल, विराट फ्रुट मर्चंट व राजेश ट्रेडर्स अशा सहा व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे 30 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई उप-आयुक्त रविकांत आडसूळ व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आरोग्य निरिक्षक राहूल राजगोळकर, निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक मुनीर फरास, मनोज लोट, शिवाजी शिंदे, स्वप्निल उलपे, महेश भोसले, नंदकुमार पाटील व करण लाटवडे यांनी केली.